​हुतूतू!!

मला नेहमीच मोठ कौतुक वाटत राजकारणात खेळल्या जाणाऱ्या खेळाचं.हुतुतूचं चालू असतो सतत पक्षापक्षांनंमध्ये, पण बाद मात्र हमखास होते ती रयत. सत्तेत असलेले पक्ष काय सॉलिड साखळी रचतात म्हणूण सांगू, कायपण करुन समोरच्यान आपटी खाल्लिच पाहीजे, त्याचा श्वास सुटलाच पाहिजे. तरच त्यांच्या खुर्च्या शाबूत रहातील ना. आता हेच बघा. शेतकऱ्यांनी पूरतं खिंडीत गाठल होत यांना. मुख्यमंत्र्यांना […]

    “तेजसं”

            फुलांच्या माळांनी सजून ती सभोवतालच्या गर्दीला चीरत आली आणि तीला बघता क्षणी सर्वांच्या तोंडातून एकच शब्द निघाला, WOW! लगेच सर्वांनी आपले स्मार्टी काढले आणि तीच्या सोबत सेल्फी घ्यायचा सपाटा लावला. मलाही सेल्फीचा मोह आवरला नाही. ती आली तशीच ऐटीत निघूनही गेली. आम्ही तीला आणि त्यात अगदी दिमाखात प्रवास करणाऱ्यांनां […]

पाऊस

  अचानक काळ्याशार ढगांची दाटी करत कोसळणारा, सर्वांची धांधल उडवणारा, भिजवणारा, हटकून चिंब होण्याचा मोह न आवरता येणारा, मातीच्या गंधानं बेभान करणारा, अनेकांच्या पहिल्या प्रेमाचा साक्षीदार. रोमँटिक असा हा पहिला पाऊस.    तोही एखाद्या विरहानं व्याकुळ झालेल्या प्रियकरा सारखा बेभान होऊन, आपल्याच उन्मादात वाटेत येणाऱ्या वृक्ष-वेलींना उन्माळत, मनात घोंगावणाऱ्या भावनांच्या सूसाट वाऱ्यासह मदमस्त होऊन तुफानी […]

तुर..टूर्…!

महीन्याच्या पहिल्या आठवड्यात नेहमी प्रमाणे खरेदी साठी आम्ही मॉल मध्ये गेलो की मी सरळ आधी किराणा भरण्यासाठी ग्रॉसरी सेक्शन मध्ये जाते.पण आज का कोण जणें  नकळतच माझे पाय थबकले ते तुरीच्या ब्यारल जवळ. गुजरात तुरीच्या अगदी शेजारी दिमाखात उभी होती ती “लातूर तुर”. गुजरात तुरीच्या मानान गडद पिवळी, आकारानं किंचीत लहान, चवदार पण स्वस्त त्यामुळं […]

“जय हो!!”

एकदा एक माकडीण आपल्या पिलासह पाण्याच्या हौदात पडली. पाणी प्यायला गेली असेल बिचारी. अचानक हौदात पाणी भरायला लागलं, तसं तीनं पिलाला पहिल्यांदा काखेत घेतल नंतर डोक्यावर घेत त्याला वाचवायचा प्रयत्न करू लागली.पण पाणी अजूनच वाढलं. आता मात्र ते तीच्या नकातोंडात जायला लागलं, जीव गुदमरायला लागला. क्षणार्धात तीनं आपल्या पिलाला पायाखाली घेतलं आणि आपला जीव वाचवला. […]

“Be a Buddy not a Bully”

परभणी जिल्ह्यातील ही घटना आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी एका सहावीत शिकणाऱ्या मूलाने स्वतःला पेटवून घेतलं, त्यात तो ८०% भाजला. उपचारादरम्यान त्याचा  मृत्यू झाला. कारण होतं, शाळेतील टारगट मूलांच्या ग्रुपनं दिलेला त्रास-मारहाण, वर्गशिक्षकानं समजून न घेता वार्षिक परीक्षेला न बसू देत  पालकांकडे केलेली तक्रार. शाळा, कॉलेज, क्लासेस इतकंचं नाही तर सोसायटीत, गल्लीत आणि गावातही ग्रुप बनवुन […]

Cash Me Ousside!!!

एक लहान मुलगी आहे. Inspirational, motivational, emotional वा empathetically प्रत्येक जणं आपाआपल्या दृष्टीकोनातून तीला बघत आहेत. करोडो डोळे तीच्या प्रत्येक हलचालींवर नजर ठेवून आहेत तर अनेक paparazzi तीच्या मागावर आहेत.या प्रकारे ती बऱ्याचजणांच्या पोटापाण्याची सोय करत आहे. इतकंच नाही तर तीने एखाद्या सेलिब्रेटिच्या तारीफची पोस्ट टाकली की त्याचा भाव वधारतोच. कमाल आहे ना! तीचा स्वतःचा […]