“Be a Buddy not a Bully”

परभणी जिल्ह्यातील ही घटना आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी एका सहावीत शिकणाऱ्या मूलाने स्वतःला पेटवून घेतलं, त्यात तो ८०% भाजला. उपचारादरम्यान त्याचा  मृत्यू झाला. कारण होतं, शाळेतील टारगट मूलांच्या ग्रुपनं दिलेला त्रास-मारहाण, वर्गशिक्षकानं समजून न घेता वार्षिक परीक्षेला न बसू देत  पालकांकडे केलेली तक्रार.
शाळा, कॉलेज, क्लासेस इतकंचं नाही तर सोसायटीत, गल्लीत आणि गावातही ग्रुप बनवुन एखाद्याला टारगेट करायचं त्याची टर् उडवायची आणि त्याची झालेली फजीती बघुन असूरी आनंद लुटायचा. आजकाल मूलांची ही एक टेंडंसीच बनत चाललीय. याला मराठीत “दादागीरी” तर ईंग्रजीत “Bullying” म्हणतात.

सहजचं तुम्ही तुमच्या मूलांसोबत या विषयावर बोलून तर बघा, या मागचं गांभिर्य निश्चीतच तुमच्या लक्षात येईल. ही ग्रुप मधली मूलं ग्रुपमध्ये रहाण्यासाठी काहीही करायला तयार असतात कारण ग्रुपमध्ये रहाणं ते प्रेस्टिजस् समजतात. त्यांना left out होण्याची भीती असते. असे हे Bullies एखाद्याच्या आयुष्यात सायलेंट पॉयझनच काम करतात. एखादं घाबरलेल, बावरलेल मूल कुठं व्यक्त होऊ शकत नाही कारण कधी कधी पालकांच्या व शिक्षकांच्या ओव्हर रियाक्ट होण्यान ते शांत होतं. शांत चेहऱ्यामागची घूसमट कुणाला लक्षातचं येत नाही कारण, “मन तुटतांना आवाज होत नाही.”

Bullies हे असे कुणी जन्मतःच नसतात तर ते घडतात. कसे? हे बघा एक साधं उदाहरण, मुलांन आपल्या पालकांनां अतिशय आनंदान आपले मार्क्स सांगितले तर पालकांनी मुलाच कौतुक करणं अपेक्षीत आहे पण तस न होता दूसऱ्या मूलाला आर्धा मार्क जास्त पडला म्हणूण आपल्या मूलाच्या मार्कांची किंमत ते श्यून्य समजतात, ह्यातूनच मूलांमध्ये जेलसी, हेट्रेटच बी पेरलं जातं. ते स्वतःला इनसेक्युअर फील करतात, त्यांच्यात लो सेल्फ एस्टिम तयार होतो.ते coward असतात त्यांना स्वताःबध्दल तिरस्कार वाटायला लागतो आणि ह्या सगळ्याचं उट्टं ते इतरांना त्रास देऊन काढतात. कुणाच्या मर्मावर घाव घालून,त्याचा अपमान करुन आनंदी होण आणि “We are doing something different” च्या नशेत वावरणं हे इतर कुठल्याही  व्यसनापेक्षा जास्त विघातक आहे कारण यात एखाद्याच विश्व, व्यक्तिमत्व इतकंच नाही तर आयुष्य नेस्तनाबूत होतं.

“मोठं व्हायचयं अन् यशस्वी व्हायचयं ना…तर मग अपमान गिळायला शिका…”
ठीक आहे. पण ज्यांच ह्याचा अर्थ समजायचं वय नाही किंवा अत्यंत संवेदनशिल आहेत त्यांच काय? सगळीच काही एकसारखी असतात असं नाही.

कालानुरूप या सो कॉल्ड स्पर्धात्मक युगात संवेदनशिलता, हळवेपणा मरत चाललाय. एकमेंकांना “मागे खेचण्याच्या शर्यतीत” मानवाची मन कोवळ्या वयातचं निबरायला लागली आहेत.Bulliesच आणि Bullying च प्रमाण वाढत चाललं आहे. त्यासाठी वेगवेगळे हातखंडे जसे Verbal,Physical, Social आणि Cyber ज्यात Facebook, Instagram, Messenger, Snapchat इ. द्वारे एखाद्याला टारगेट केलं जातं.

अर्जुन भारद्वाज नावाचा तरुण अशातच स्वतःच्या आत्महत्येचा Video बनवून तरुणाईतील दबलेल्या उद्विग्न भावनांचा आक्रोश जगासमोर ठेवून गेला. हा Cyber Bullying चा प्रकार असू शकतो. वरकरणी दिसणाऱ्या त्याच्या भाबड्या चेहऱ्यामागच्या भावनांच्या प्रचंड गुंत्यात तो घुसमटला असणार आणि शांत पणे स्वतःला संपवण्याचा क्रूर खेळ त्याने स्वतःशीच खेळला.

ही व्रात्य- टारगट मूलं आता जरी अशी वागत असली तरी एक दिवस त्यांना त्यांची चूक लक्षात येईल, गिल्टी फीलींग येतील असचं काही नाही ते मोठे होऊन कामाच्या ठिकाणी  ज्युनिअर्सना छळू शकतात.याची व्यप्ती लहान मूलांन पुर्तीच मर्यादित नाही तर ऑफिसेसमध्ये, राजकारणात इव्हन बऱ्याच घरां मध्ये सुनेला छळण्यासाठी वा शेजाऱ्यांना छळण्यासाठी मोठी मंडळी ही याचा सर्रास वापर करते आणि त्याचचं अनुसरन नकळत मूलही करायला लागतात.

कधीही कुणीही असा intimidation न शिकार होतांना दिसला तर त्याच्या बाजूने जरुर ऊभे रहा कारण तुमच्या सहानुभूतीच्या दोन शब्दांमुळं एखाद्याचा जीव वाचू शकतो.

 “आपला तो बाळ्या अन् दुसऱ्याचं ते कार्ट.” ही प्रवृत्ती मनातून काढून टाकली पाहिजे.

गितकार- ग. दी. माडगुळकर.                               गायीका- आशा भोसले.                                   संगीतकार- श्रीनिवास खळे.                                 चित्रपट- सुखाचे सोबती

जेष्ठ अभिनेत्री सुलोचनाजींवर चित्रीत केलेलं हे गीत  आपल्याला बरचं काही सांगून जातं
“एका तळ्यात होती बदके पिले सुरेख,
होते कुरुप वेडे पिल्लू तयात एक.”

त्या कुरुप पिलाला मोठं होऊ दिलं तरचं तो आपल्यातल्या राजहंसाला ओळखू शकेल नाही का?

“Instead of teaching kids to learn how to deal with Bullies, how about to teach them not to be a Bully.”

                 सौ. संजीवनी क्षिरसागर मांडे

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s