The Bitter “LAW”

“बाबांना दवाखान्यत ऍडमिट केलय” म्हणून अचानक एक दिवस माझ्या भावाचा फोन आला. मला वाटलं काही तरी थोडफार झाल असेल, कारण त्यांच कमवलेल शरीर होत, नेव्हीत सिलेक्शन झालेले,मलखंब, दोरखांब, लाठ्याकाठ्या आसो का कुश्ती सगळ्यात अनेक मेडल-कप कमावलेले.इतकच नाही तर रोज पहाटे चार-साडेचारला ऊठून वॉकला नियमित जायचे.दर आषाढी -कार्तिकी एकादशीला दिंडीत पंढरपूरची पायी वारी करायचे.शांत आणि साधी राहणी. पण क्षुल्लक डोकदुखी एवढ रूद्ररूप धारण करेल याचा अंदाज कुणालाच काय त्यांना पण आला नाही. नियतीन डाव साधला आणि सिटीस्क्यान मधे 
सिव्हिअर ब्रेन ह्यामरेज दाखवल.ताबडतोब त्यांना ICU मध्ये शिफ्ट केलं.

इकड मी सतत फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत होते पण कुणीही मला तितकस व्यवस्थीत सांगत नव्हत. माझी बेचैनी वाढतच होती.संध्याकाळी सहा-साडेसहाच्या आसपास एक अनोळखी फोन आला. “कुठ आहेस? निघालिस का? निघ लवकर!” हे तीन वाक्य बोलून फोन कट केला.पण त्या तीन वाक्यान माझ्या पायाखालची जमीन सरकली.आख्ख ब्रम्हांड माझ्याभोवती फिरतय अस वाटायला लागलं.दूसऱ्याच क्षणी माझ मन म्हणालं, “छे! छे! अस काही मनात आणू नकोस. कारण काल ह्याच वेळी तर तू बाबांशी बोलली होतीस, सर्व काही ठीक होत मग अस कस अचानक काही होईल? हे शक्य नाही” म्हणत मी धाडकन सोफ्यावर बसले.

संध्याकाळच्या फ्लाईटने माझे मिस्टर आमदाबादहून येणार होते तो पर्यंत मी देवापुढे  रामरक्षा म्हणत बसले.ते आले आणि लहान भावाचा फोन आला,”ताबडतोब निघा”.कॅबने आम्ही नांदेड गाठलं. हॉस्पिटलमध्ये पोचल्या बरोबर संजू !आलीस? म्हणत तीथं जमलेल्या नेतेवाईकांनी आम्हाला ICU मध्ये नेल.बाबा कोमात होते. ते व्हेंटिलेटरवर होते.माझी मोठी बहीण आणि भाऊजी रात्रंदिवस बाबाजवळच होते. मोठा भाऊ दवाखान्यात तर लहान भाऊ अख्खा नांदेडभर फिरून बाबांसाठी लागणारी होमीओपेथी,आयुर्वेद, ऑलोप्याथी जो कुणी सांगेल ती औषध आणत होता. 

दोन मिनीटच मला ICU मध्ये थांबू.दिल आणि लगेच आईला सांभाळण्याची जिम्मेदारी माझ्यावर सोपवली.माझी आवस्था भ्रमिष्टासारखी झाली होती.मला काहीच कळत नव्हतं पण आईला बघताच मी एकदम भानावर आले. तीला आता मला सांभाळायच होत.ती शुगर पेशंट काल पासून काही तीच्या पोटत गेल होत का नाही काय माहीत. ती कुणाचही एकत नव्हती पण माझ्या एका शब्दात निमुटपणे माझ्या सोबत घरी निघाली. चार घास खाल्ले आणि आयुष्यात पहिल्यांदाच ती माझ्या कुशीत विसावली. तीचा डोळा लागला. 

सकाळी आठ वाजता मोठ्या भावाचा फोन आला.”पल्सरेट स्लो झालीय” म्हणाला आणि रामनवमीला आमच्या बाबांना रामाने आयुष्यच्या वनवासातून मुक्ति दिली.आमच प्रेम हरल आणि देवच जिंकलं. दबा धरून बसलेल्या काळान डाव साधला आणि दुःखाच भयान तांडव मागे ठेऊन गेला.

आता हे आईला कस सांगायच की “बाबा शेवटच तूला भेटायला घरी येत आहेत” ती कशी रिऍक्ट करेल. तीला तर ते बेशुध्द आहेत एवढच माहीत होतं. आम्हा भावंडाची आवस्था मी शब्दात व्याक्त करूच शकत नाही. पण आशा वेळी परमेश्वर खरच कुठून शक्ती देतो कुणास ठाउक? मी हे सगळ कस आईला सांगीतल हे मलाही आठवत नाही.

बाबा घरी आले. दूःख-आक्रोशाच्या कल्लोळात आईला कोलमडू द्यायच नाही एवढच आमच्या ध्यानात होत. तर आम्हाला सावरण्याच काम नातलगांनी केल.

ह्या रामनवमीला एक वर्ष पूर्ण होईल बाबांना जाऊन.चालता बोलता गेलेले बाबा आम्हाला आजूनही आमच्या आसपास आसल्याचा भास होतो. ते आयुष्यभर स्वाभिमानाने जगले आणि स्वाभिमानानेच गेले.

रोज आईला न चुकता फोन लावते. ती बाबांबध्दल भरभरून बोलते आणि मन मोकळ करते. ती माझ्या ओंजळीत तीने बाबांसोबत जगलेल्या क्षणांच्या आठवणी टाकते तर मी धीराचे बोल.

आयुष्यात प्रथमच त्या दिवशी आम्हाला दुःखाची व्याख्या कळली आणि आयुष्याकडं बघण्याचा दृष्टीकोनच बदलला.जीवन क्षणभंगूर असतं, जगात जन्मलेला प्रत्येक माणूस मरतो पण प्रत्येक जगतोच अस नाही म्हणून प्रत्येक क्षण आनंदान जगायच ठरवल.आयुष्य हे जीवन आणि मृत्यू मधला छोटासा आवकाश आहे, तो आपण आनंदी राहून इतरांनाही आनंद देत जगल पाहीजे. सदैव आपली माणसं, चांगली नाती सांभाळली पाहीजे. ती आपल्याला कुठल्याही प्रसंगात साथ देतात.

खरं सांगायच तर आपल्याला आपल्या मरणाची कधीच भिती वाटत नसते पण भिती वाटते ती आपल्या प्रिय जणानां काही व्हायची.म्हणून त्यांची काळजी घेत त्यांना आधार देत जगण्याचा प्रयत्न करत आहे.

Every thing Dies. That is the law of life. The bitter unchanged law.

  शेवटी एवढच,

 बाबा तुम्ही घाई केलीत।                                     अचानक पडद्यामागे एक्झिट केलीत.                   सावरायला ही देवाने दिला नाही वेळ।                       नियतीने खेळ ला आमच्याशी क्रूर खेळ.                  . आम्ही भावंड झालोय पोरकी                                     जसे शिडाविन जहाज घेत गिरकी .                           प्रत्येक क्षणी  जीवनात तुमचाच होता आधार,             तुम्हीच आमच्या जीवनाचे शिल्पकार .                   चिमुकल्या हाताना आधार देत शिकवले चालायला,     आमचा डाव आला तर प्रयाणाचा बेत आखला.   स्वाभिमानान कस जगावं हे तुमच्या कडून शिकावं ,             फणसासारख कठोर दिसून मृदूपण जपावं.            शिकवलत तुम्ही खायला दही आणि भात,                   असे अचानक का गेलात सोडुन आमचा हात?        दमलेल्या बाबांची कहाणी आम्ही कधी ऐकलिच नाही, आयुष्यभर कष्ट करून तुम्ही कधी दमलाच नाहीत.     नातवंडांनाही आठवतात तुम्ही सांगितलेल्या गोष्टी,         निजत होतात त्याना घेऊन पोष्टी.                        नकळतच डोळे भरून येतात होतो आम्ही उदास,   एकमेकांना सावरण्याचा करतो फूका प्रयास.               ठेऊन गेलात घराच्या कानाकोपऱ्यात पाऊलखुणा, आठवणीने तुमच्या जीव होतो केविलवाणा .

 बाबा ,

       तुमच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
                                                                                           सौ. संजीवनी क्षीरसागर मांडे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s