Cash Me Ousside!!!

एक लहान मुलगी आहे. Inspirational, motivational, emotional वा empathetically प्रत्येक जणं आपाआपल्या दृष्टीकोनातून तीला बघत आहेत. करोडो डोळे तीच्या प्रत्येक हलचालींवर नजर ठेवून आहेत तर अनेक paparazzi तीच्या मागावर आहेत.या प्रकारे ती बऱ्याचजणांच्या पोटापाण्याची सोय करत आहे. इतकंच नाही तर तीने एखाद्या सेलिब्रेटिच्या तारीफची पोस्ट टाकली की त्याचा भाव वधारतोच. कमाल आहे ना! तीचा स्वतःचा एक रियालिटी शो पण आहे. त्याचं तिकीट आहे फक्त ₹30,000. लवकरच ती 14 व्या वर्षात पदार्पण करणार आहे आणि मिलेनिअर बणणार आहे. ती गाते, ती नाचते,अनेक शो मध्ये मुलाखती देते. ग्रेटच ना! हे सगळं फेम, तीनं फक्त एका वर्षात achieve केलय. “Just out of imagination” आहो खरचं! तीच व्यक्तिमत्व आहेच तसं “Just out of imagination”
Cool ना! पण Horrible हं!

सहज नेटवर सर्च करत असताना माझी या मुलीच्या Video वर नजर पडली.अबब! किती हे लाईक्स आणि शेअर ,आकडा बघून मला मोह आवरला नाही आणि तो मी बघीतला. अक्षरशः मी हदरलेच. हा Video बऱ्याच लहान मुलांनी, टिनऐजर्सनी जस्ट क्युरिओसिटी म्हणुण बघितलाच असणार. कारण सोशलनेटवर्क तर आता एका क्लिक् वर आलयं. त्या मुलीला मिळालेलं ग्ल्यामर बघून नक्किच त्यांच्या तोंडाचा चंबू करून ते पूटपूटले असणार,” WOW!!! This is something different! If she can, Why can’t I?”

त्या मुलीचं तसं वागणं हे स्पॉईल करणारं आहे.पालकांची झोप उडवणार आहे. इतर मूलं, “Just do something OUT OF THE BOX” म्हणतं तीची कॉपी करतात, अशा सांस्कृतीचं क्रेझ आसलेली मुलं नाहक बळी पडू शकतात.

 त्याचा अनुभव मला आला. आमच्या बिल्डींगच्या शेजारी असलेल्या बागेत मी Morning walk ला जाते. तिथं बरीच कॉलेजची मुलं मुली येतात, बसतात. काय आहे ना की त्याचं लोकेशनच तस आहे अगदी दोन कॉलेजच्या मध्ये. मग काय! बंक मारुन का कसे त्याची कल्पना नाही, पण बसतात बिच्चारे!. तर परवा काय झालं, दोघे बसले होते हो, ना कुणाच्या आध्यात ना मध्यात. पण एका आजींनी नाक खुपसलं त्या दोघातं. मग काय! अरे बापरे! ती मुलगी उठली आणि तीने आजीलाच प्रश्न विचारला,” तुम्हीही हेच केलं असेल ना आमच्या वयात?” सोबतचा मुलगा कुत्सितपणे हसला. त्यावेळी आक्षरशः आपली इंडियन मुलगी Video मधल्या मुलीच्या तोडीस तोड वाटली.वा! काय स्टाईल होती बोलण्यात.

तर सोशल बेबसाईट मुळं ग्लोबल झालेली आणि पॉप्युलर झालेली ही कन्या आहे अमेरीकेची. तीने सातवीत असतानांच शाळे ऐवजी पब पार्टयांना हजेरी लावली, कुठंही कधिही मनसोक्त हुंदडते. अरे तीचा attitude तर पैश्यासाठी वाट्टेल ते! असा अफलातून, भन्नाट वैगरे वैगरे आहे हो. बाकी तर तुम्हाला Video बघून समजेलचं.

आपल्या इथं याचं लोन आलं नसेल कश्यावरून? नुकतीच उजेडात आलेली स्वतंत्र्याच्या नावाखाली अत्यंत बीभत्स विचारसरणिचा प्रचार करणारी” शिफुसंस्कृती”याचचं तर द्योतक नसेल? मुलांच खोट बोलण्याचं, आपल्या चुका लपवण्यासाठी इतरांवर खोटा आळ घालनं, स्वभावात आलेली कमालीची आक्रमकता, चिडखोरपणा हट्टिपणाच प्रमाण वाढत आहे. पब पार्टि संस्कृतीची वाढती क्रेझ. छोट्या बच्चेकंपनीच्या म्याकडी-कोकच्या पार्ट्या कोकेन पर्यंतचा पल्ला कधी गाठायला लागतात त्याचा पालकांना पत्ता पण लागत नाही. यो यो हनी सींग व तत्सम लोकांनी आपल्या सुपरहिट आणि सुश्राव्य गाण्यांच्या रचनांचा( यो- यो)अविष्कार करुन भारतीय संस्कृतीचा घो! केला आहे. गणपतीत, लग्नात जेंव्हा 3-4 वर्षाचे कोवळे लेकरं या गाण्यावर थिरकायला लागतात आणि त्यांचे पालक कौतुकाने ते एन्जॉय करतात तेव्हां अक्षरशः कीव येते त्यांची.

हं! तर Danielle Bregoli हे त्या मुलीचं नाव आणि डॉ.फिल हे एक्सट्रा ऍक्टिव्ह, आपल्या भाषेत वाया गेलेल्या मुलांच्या मुलाखती घेणारे, त्यांच्या भावना, त्यांच्या मनात चाललेली उलथापालथ, त्यांच्या पालकांकडूनच्या समाजाकडूनच्या अपेक्षा, गरजांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करुन पालक व त्यांच भटकलेल मूल यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करतात की जेणेंकरुन भावी पिढीची सुदृढ आणि निकोप वाढ होईल. तर तीची हिच ती माझ्या बघण्यात आलेली हीट झालेली मुलाखत, तीच्या तोंडून येणारऱ्या वाक्यांवर प्रेक्षकांच्या अनेकदा का टाळ्या पडल्या? आणि बघता बघता ती अनेकांची का चाहती झाली? हे मला कळलं नाही. तीच्या तोंडचं स्पेशल accent मध्ये असलेलं हे वाक्य “Cassh me outsside? How bout dah?” तर स्लोगनच बणलयं. हे संकेत काही बरे नव्हेत. ती तशी का बनली आणि परत कुणी त्या मार्गावर जाऊ नये म्हणून प्रबोधन करण्या पेक्ष तीच्या वागण्याच उदात्तिकरणं होतयं. त्या मोहजाळात फसुनं उद्या अशा अनेक Danielle Bregoli आपल्याला आपल्या आवतीभोवती वावरतांनां दिसतील तर नवल नाही.

सोशलनेर्वकिंगवर दाखवल्या जाणाऱ्या अशा गोष्टिंचा व त्याचा propaganda करणाऱ्यावर नियंत्रणं ठेवलचं पहिजे. निश्चितच तुम्हीही सहमत असालचं.

मुलांवर भरभरुन प्रेम केलचं पाहिजे. पण,

Love your children with all your hearts, love them enough to discipline them before it is too late. Praise them for important things, even if you have to attach them a bit. Praise them a lot. They live on it like bread and butter and they need it more than bread and butter. 

                         सौ.संजीवनी क्षिरसागर मांडे.

Leave a comment