​हुतूतू!!

मला नेहमीच मोठ कौतुक वाटत राजकारणात खेळल्या जाणाऱ्या खेळाचं.हुतुतूचं चालू असतो सतत पक्षापक्षांनंमध्ये, पण बाद मात्र हमखास होते ती रयत.
सत्तेत असलेले पक्ष काय सॉलिड साखळी रचतात म्हणूण सांगू, कायपण करुन समोरच्यान आपटी खाल्लिच पाहीजे, त्याचा श्वास सुटलाच पाहिजे. तरच त्यांच्या खुर्च्या शाबूत रहातील ना. आता हेच बघा.

शेतकऱ्यांनी पूरतं खिंडीत गाठल होत यांना. मुख्यमंत्र्यांना तर काय कराव काहीच सूचत नव्हतं पार गोंधळ उडाला होता त्यांचा. त्यांच्या आवस्थेनं भांबावलेल्या त्यांच्या शिलेदारांचा तोल सुटायला लागला, कुणी काय तर कुणी काय वाट्टेल ते मुक्ताफळ उधळायला लागला.

संप उधळण्यासाठी काही फितूरांनांही हाताशी घेतलं पण ते फेल! 

मग काय, कस तरी तोडून जोडून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याची राजेशाही घोषणा झाली. कित्येक शेतकऱ्यांना त्यातली गोम कळालीच नाही. आधीच हातावर पोट आसलेला शेतकरी किती दिवस संप करणार? वरून पावसाळा आलेला.पेरणीचे वेध लागणारच. फटाके फोडून मागण्या मान्य झाल्याचं लटकं बिगूल वाजवलं आणि तो भूलला. सरकारनं सुटकेचा श्वास घेतला.

शेतकरी कर्ज माफीच्या म्हणजेच कोपराला लावलेला गूळ खाण्याच्या प्रयत्नात गुंगला. फडताळात चिंधीत बांधून ठेवले कागद घेऊन

बँकाचे उंबरे झीजवायला लागला. सरकारनं बरोबर कामाला लावल त्यांना.

शेतकऱ्यांच्या काळजीपोटी पेरण्या साठी बँकांनी तातडीची 10,000₹ ची मदत द्यायच  फर्रमान जारी केलं. वा.. छान! पण इथंल्या गोचीची त्यांना म्हणजे सत्तापक्षाला कल्पना नसेल..?

आहो! नोटबंदी मूळं राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये जमा झालेल्या जून्या नोटांचा खच तसाच पडून आहे. रिझर्व्ह बँका स्विकारत नसल्याने या  बँकांचे अर्थकारण कोलमडले आहे.”आडातच नाही तर पोहऱ्यात कस येईल?” यालाच म्हणतात आपला चेंडू दूसऱ्यांच्या कोर्टात टाकणं. इथं शेतकऱ्यांची खदखद बँकांवर नीघू शकते. परत शेतकरी अडचणीत येणार आणि परत त्यांना कुरवळून भूलवण्याची संधी मिळणार. आशा रीतीने नवी खेळी खेळण्यास उसंत त्यांनीं कमवलीय.

पण ह्या सगळ्या घटनांनवर विरोधीपक्ष आणि घटक पक्षाची “गिद्द कि नजर”नसली तर नवल?

ह्याचा हमखास फायदा ते घेणारच.

सत्तापक्षाकडून आलेल्या आवतानानं काही पदरात पडेल या आशेनं घटक पक्षांच्या तोंडाला पाणी सुटलचं असणार म्हणून धावत पळत ते पोहचले सूध्दा.

बघा! वाघालाही उंदराची गरज पडते बरं.

 राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीतही शेतकऱ्यांच्या प्रश्नांच रजकारण करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न होत आहेत. तो जर यशस्वी झाला तर षटकारच ठोकलाय समजा, चेंडून जर बरोबर बॉण्डरी क्रॉस केली तर सगळा डाव खिश्यात! म्हणजे बोक्यांच्या भांडणात लोण्याचा गोळा अलगद घश्यात. वा क्या बात है!

मग त्यांना काम उरतं ते मस्त मस्त ,अगदी रोम रोम पेटून उठणारे आणि रक्त खवळणाऱ्या भाषणांचे स्क्रिप्ट तयार करायचं बस्स.

मला हे कळत नाही की सत्तापक्षाने जर त्यांच्या म्हणण्या प्रमाण राज्याचा- देशाचा विकास करण्यासाठी कष्ट उपसलेत तर मग ही आत्तापासून येणाऱ्या निवडणूकीसाठीची लगीनघाई कश्याला? मध्यावधी निवडणूकीचे डोहाळे कश्याला?

काम केलयं ना .. तर मग..फळ निश्चीतच मिळणार…
सौ. संजीवनी क्षीरसागर मांडे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s