“तेजसं”

           

फुलांच्या माळांनी सजून ती सभोवतालच्या गर्दीला चीरत आली आणि तीला बघता क्षणी सर्वांच्या तोंडातून एकच शब्द निघाला, WOW!
लगेच सर्वांनी आपले स्मार्टी काढले आणि तीच्या सोबत सेल्फी घ्यायचा सपाटा लावला. मलाही सेल्फीचा मोह आवरला नाही.

ती आली तशीच ऐटीत निघूनही गेली. आम्ही तीला आणि त्यात अगदी दिमाखात प्रवास करणाऱ्यांनां बघतच राहीलो. दूसऱ्याच दिवशी छिन्नविछिन्न आवस्थेतला तीचा अतिशय विदारक  फोटो पेपरात आला, बातमी वाचली. खूप वाईट वाटलं, अस्वस्थ झाले.

अरे! अस कसं? कुणी केलं असेल हे? आणि का? कश्यासाठी? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात यायला लागले.

तशी ती काही चाँद ताऱ्यांनी नटली नव्हती, केशरात नहाली नव्हती, नीळा शालू ल्याली नव्हती का तीच्या जवळ कुठला क्रॉस वा कृपाण वैगरे काही काही नव्हतं. तरीही? मग! मग काय? हेच सिध्द होतं की विध्वंसक कृती करणाऱ्यांसाठी कुठल्याही गोष्टींच सोयरसूतक नसतं त्यांना करायचा असतो फक्त विध्वंस आणि खिसेभरूगिरी. अगदी तेच घडलं तेजसं सोबत. द बर्निंग ट्रेन, टायट्यानीक ह्या पहील्याच प्रवासादरम्यान प्रवाश्यांसकट संपल्या तसं काही घडल नाही हे नशीबच समजायचं.

LED TV, बायो व्ह्याक्युम टॉयलेट्स, GPS बेस्ड डीस्प्ले, फूल्ल वाय फाय, CCTV, वातानुकुलीत, सुंदर आरामदायी आसन व्यवस्था, फूल्ल टु टकाटक आशी ब्रॅण्ड न्यू,

भारतातील सूपर एक्सप्रेस. मुंबई- गोवा एक्सप्रेस, तेजसला रेल्वेमंत्री सुरेश प्रभुनीं 22 मे या दिवशी हीरवा झेंडा दाखवला होता तीची त्याच प्रवासादरम्यान भारतीय नागरीकांनीं

 केलेल्या आवस्थेनं दाखवुन दिलय की कितीही हायफाय आसल्याचा आव आणला तरी चिंधीगिरी काही अंगातली गेलेली नाही.

हॉटेलातले चमचेच काय टूथपिकही जाता जाता खिशात घालणारे, रोड दुरूस्तीसाठी टाकलेल्या मुरूमान आंगनच लेवलिंग करून त्यावर पेव्हर ब्लॉक लावणारे, टेलीफोन, MSEBच्या वायरांचा वापर कपडे सूकवण्यासाठी करणारे, मूलांचा खाऊ फस्त करणारे, खासगी वाहनांवर भारत सरकार वा पुलिस ची पाटी लावून कायद्याच उल्ंघन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाभागांची आपल्या देशात काही कमी नाही. इतकंच नाही तर परवा मी बाजारात फूटपाथवर एकाला भारतीय रेल ब्रॉंडचे साडीपेटीकोट विकतांनां पाहीलं.

गेल्या 63 वर्षात ह्या उचलेकरांमध्ये काहीही कमी झालेली नाही की प्रगल्भता आलेली नाही. याच जीवंत उदाहरण म्हणजे “तेजसकांड”.

आश्यान बेताल वक्तव्य करणाऱ्या नाकर्त्या नेत्यांच फावतं व जनतेवर गरळ ओकण्याची आयती संधी मिळते. 

कोणतेही महामंडळं, खासगीसंस्थाच काय कुठलेही सरकार लोकहितार्थ सार्वजनीक उपक्रम आमंलात आणण्यापूर्वी हजारदा विचार करतील मग सहाजीकच गैरसोय होते म्हणूण कंठशोष करून काहीही उपयोग होणार नाही.

सार्वजनीक संपत्तीला आपली वारसाहक्काची प्रॉपर्टी समजणाऱ्यांनो जोवर त्याच हक्काने तीला सन्मान देऊन तीचे जतन करणार नाहीत तोपर्यंत देश सुधारणार नाही भले कितीही सत्तांतरे घडवून आणली तरी. क्यों की,” पहिले अपनी गिरेबान में तो झॉंको.”

       सौ. संजीवनी क्षीरसागर मांडे.

Advertisements

One thought on “    “तेजसं”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s