पाऊस

 

अचानक काळ्याशार ढगांची दाटी करत कोसळणारा, सर्वांची धांधल उडवणारा, भिजवणारा, हटकून चिंब होण्याचा मोह न आवरता येणारा, मातीच्या गंधानं बेभान करणारा, अनेकांच्या पहिल्या प्रेमाचा साक्षीदार. रोमँटिक असा हा पहिला पाऊस.

   तोही एखाद्या विरहानं व्याकुळ झालेल्या प्रियकरा सारखा बेभान होऊन, आपल्याच उन्मादात वाटेत येणाऱ्या वृक्ष-वेलींना उन्माळत, मनात घोंगावणाऱ्या भावनांच्या सूसाट वाऱ्यासह मदमस्त होऊन तुफानी बरसतो आणि धरतीही त्याच्या प्रेमात चिंब भिजून दरवळायला लागते. आहा हा! तो मृदगंध सर्वांनाच मोहिनी घालतो. झिंग आणतो. समस्त चराचर बरसणाऱ्या पावसाच्या आणि त्याच्या प्रेम आराधनेत अकंठ चिंब भिजणाऱ्या धरतीच्या विहंगम दृष्यानं मोहरून जातं.

   अनेक दिवसांपासून बाष्पिभवना द्वारे छूपके-छूपके चाललेल्या प्रेमसंदेशांना पूर्णविराम देत हा सैराट बरसतो. मोर नाचतो,चातक तृप्त होतो तर बळीराजाच्या अंतरी सुगीचे स्वप्न अंकुरतो. झाडे वेली आख्खी सृष्टी नाहून निघते आणि परत सूर्याच्या सोनेरी किरणात लखलखत सजुन-धजून धरती आपल्या प्रियकराला पुर्नमिलनाची ओढ लावते आणि तोही परत बरसून तीला दिलेल्या वचनाला जागतो.

    पहिलं प्रेम, पहिला पाऊस, पहिल्या प्रत्येक क्षणांच स्थान आपल्या जीवनात काही वेगळच असतं. ते हवे हवेसे वाटतात. हो ना!

पण हाच पाऊस अवेळी बरसला तर! तर तो वळवाचा असतो, तो अवकाळी असतो म्हणजेच वेळ-काळाचं भान नसलेला.तो कुठल्या नाजुक क्षणांचा साक्षिदार नसतोच, तर तो असतो फक्त आणि फक्त स्वप्नांना उध्वस्त करणारा.नको नकोसा.

   “उध्वस्त”. आजकाल आपलं काही असचं चाललयं अवकाळी पावसासारखं. नव्या पिढीकडं आशावादानं पहात असतांनां कुठंतरी चूकतय हे प्रकर्शानं जाणवतयं ते त्यांच्या जीवनशैलित आलेल्या सैराटपणा मुळं. जीवनमुल्यांना जपत, भविष्याला घडवत, चारित्र्य संपन्न बनण्यात स्वतःला वाहून घेण्याकडचा कल कमी झालेला दिसतं आहे. म्हणून एवढचं ध्यानात ठेवावे,
      “धन गया तो कुछ न गया। 

       शरीर गया तो थोडा गया।

       चरित्र गया तो।

       सबकुछ गया।।”
“पहिल्या पावसासारखं स्वप्न फूलवत जगा.”

     पहिल्या पावसाच्या शुभेच्छा!!!!
      सौ. संजीवनी क्षीरसागर मांडे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s