तुर..टूर्…!

महीन्याच्या पहिल्या आठवड्यात नेहमी प्रमाणे खरेदी साठी आम्ही मॉल मध्ये गेलो की मी सरळ आधी किराणा भरण्यासाठी ग्रॉसरी सेक्शन मध्ये जाते.पण आज का कोण जणें  नकळतच माझे पाय थबकले ते तुरीच्या ब्यारल जवळ. गुजरात तुरीच्या अगदी शेजारी दिमाखात उभी होती ती “लातूर तुर”. गुजरात तुरीच्या मानान गडद पिवळी, आकारानं किंचीत लहान, चवदार पण स्वस्त त्यामुळं तीच्या भोवती ग्राहकांची गर्दी. तीच्या कडं बघून नेहमीच आभिमानानं ऊरं भरुन यायचा. आपल्या गावच्या मातीतली म्हणुन.पण या वेळी मात्र मी जरा खीन्न आणि जड अंतःकरणाने तीला ब्याग मधे भरत होते. किमंत होती ₹76.50 प्रती किलो. आहो तसं नाही! ती महाग म्हणून नव्हे तर तीचा उत्पादक कवडीमोल भावाने विकतोय आणि इंथ तीचा भाव ! म्हणून.
खरंतर दुष्काळाला तोंड देण्यासाठी व उसाला पर्याय म्हणून शेतकऱ्यांना सरकारनेच तुर उत्पादन करण्यास भरीस पाडलं, पिक अमाप आलं आणि नियोजना आभावी सरकारी यंत्रणेची फट्फजीती उडाली.याचा फायदा नेहमी प्रमाणे व्यापारी वर्गाने घेतला नाही तर नवल. यथावकाश त्यांनी त्याचा फायदा घेत एका नव्या फ्रॉडला जन्म दिला. ग्राहकां पर्यंत फूगलेल्या किमंतीने माल पोचवत त्यांचे गाल आधीकच फुगले, इकडं मात्र शेतकऱ्यांचे खप्पड चेहरे आणि कष्ट करुन चिप्पाड झलेले शरीरं, तुरी पायी झूरणीला लागलेत. वरुन क्याशलेस क्रांती तर त्यांच्या मूळावरच आली आहे.
शेतात राबणारे म्हणजे देशाचे कायदेशीर वेठबिगार आसाच समज सर्वांचा झाला आहे. त्यांनी त्यांच्या श्रमाची कही शिल्लक गाठीशी ठेवावी याचं सोयीर सुतकं कुणालाच नाही. सुगी पिकली की शेतमालाचे भाव पाडायचे, शेतकऱ्यांची लूट करायची परीणामी दूष्काळात तग धरायला त्यांच्यात त्राणच उरत नाही, शेवटी आपलाच शेवट करायचा.ही परीस्थीती शेतकऱ्यांचीच नाही तर त्यावर आवलंबून असणाऱ्या भूमिहीनांची देखील आहे. वरचेवर भूमिहीनांच प्रमाण वाढतच आहे. निसर्ग दगा देतच आहे म्हणून काढलेल्या पिक विमा योजना, स्किल इंडिया आशा तत्सम योजना नुसत्या फूसके बार आहेत हो.

आता हे शेवटच पत्र वाचा, लातुरचंच आहे हे.
“मी शीतल व्यंकट वायाळ चिठ्ठी अशी लिहिते की, माझे वडील मराठा कुणबी कुटुंबात जन्मले असल्यामुळे आणि त्यांच्या शेतातील सलग पाच वर्षांपासूनच्या नापिकीमुळे आमच्या कुटुंबांची परिस्थिती अत्यंत हलाखाची व नाजूक झाली असून माझ्या दोन बहिणींचे लग्न ‘गेटकेन’ (साखरपुड्यातच लग्न करणे) करण्यात आले, परंतु माझे लग्न गेटकेन करण्यासाठी दोन वर्षांपासून बापाची दरिद्री संपत नव्हती. कुठल्याही बँकेचे किंवा सावकाराचे कर्ज माझ्या बापाला न मिळाल्यामुळे माझे लग्न दोन वर्षापासून रखडले होते. तरी मी माझ्या बापावरील वजन कमी करण्यासाठी व मराठा समाजातील रुढी-परंपरा, देवाण घेवाण कमी करण्यासाठी स्वखुशीने आत्महत्या करीत आहे. तरी मला व माझ्या कुटुंबाला समाजाने कुठलाही दोष देऊ नये.”

                              – शीतल वायाळ

हे वाचून आत पोटात कुठं तूटलं नाही का हो?

शीतल अगं तूझ्या आत्महत्येन समाज सुधारेलं असं वाटतं?या समाजाकडून तू काय अपेक्षा ठेउन आत्महत्या केली. याच समाजाने आशा हुंड्यासाठी झालेल्या नवविवाहितेच्या अनेक कत्तली उघड्या डोळ्यानं पचवल्या आहेत. अगं, तु रुपानं,गुणानं, संस्कारान सोन आसलीस तरी तुझी किंमत शून्य आहे कारण इथं,”सबसे बडा रुपय्या” एवढचं नॉलेज असणारा समाज आहे. कदाचीत याची जाणीव तुला झाली असणार म्हणूनच तू तरणी पोर म्हणजे बापाच्या गळ्यातला धोंडा म्हणत दरिद्री बापाचा घोर मीटवला असणार. हा निश्चितच यावर उपाय नाहिए.कारण सध्या माणसाच्या मरणाला किंमतच उरली नाही. जगूनचं लढा द्यावा लागणार आहे. कित्येकांच्या खिशात सरणा साठी पण पैसे नाहीत. म्हणून तरी जगा.

अरे तुमच्या जखमांवर मीठ चोळायला काय कमी नेते आहेत? 

शेतकऱ्यांचे जाणकार म्हणवणारे रावसाहेबांची बात तर भारीच आहे. ते म्हणतात,”एवढी तुर खरेदी केली तरी रडतात साले.” वा…दाजी! वा…! केवढी ही आत्मियता.

“असे रडे धंदे करु नका.” म्हणजे निराश होऊ नका, रडू नका. असं बरं.

“तुरीला असं झालं, कापसाला तसं झाल, जे केलं ते सांगा. हमी भाव पेक्षा …………आधिचं सरकार पण असचं करायचं”. फार आभिमान वाटला हो हे एकूण कारण एवढ्या पोटतीडकीनं कोण सल्ला देतय हो आजकाल. जरा समजून घ्या, म्याचुअर व्हा !

तू लय पेपर वाचायला का? वाचू नको! म्हणजे पेपर वाचून तुम्ही कश्याल डोक्याला ताप करुन घेता, असंच काही काळजी पोटी सांगायला गेले पण ते कुणाला रुचलं नाही. मग काय प्रांजळ पणे माफी मागितली. म्याटर खल्लास! पण ह्या मेडीया वल्यांनी त्याच एन्टरटेनमेंन्ट…एन्टरटेनमेंन्ट.. एन्टरटेनमेंन्ट केला आणि विरोधकांनी हशा केला. आता मागून रावांची वरात येईल सारवासारवी करायला.

काहीही असो,शेतकरीही सुज्ञ झालायं.एकंदरीत आश्या बालिश “टूर्..टूरीनं” प्रश्न तर सुटणार नाहीतच.उलटं भडका उडेल याच भान  संवेदनशील प्रसंगी ठेवायला हवं.

विचार करता करता माझी नजर माझ्या शेजारील  ब्यारल मधून स्कूपनं दाळ उपसणाऱ्या ग्राहकांवर गेली, खरंच त्यांना अंदाज आसेल का हो तीला इथंपर्यंत पोचवण्या साठी कष्ट उपसणाऱ्या शेतकऱ्याच्या परिस्थीतीचा. जस्टीन बिबर या कॅनडीयन वर 5000 ते 15000 रुपये उधळणाऱ्या 45,000 पेक्षा जास्त मुंबई करांना भारतीय शेतकरी तरी माहीत आहे का नाही प्रश्नच आहे.

 माझ्या लिहीण्यान काही चमत्कार घडेल हे मला अपेक्षीतच नाहीए. मनाला कुठंतरी बोचलं म्हणून ते उतरुन काढलं. आणि हो, माझा कुठल्याही पक्षाच्या कार्यावर आक्षेप घ्यायचा मनसूबा नही बरं. ह्या पोस्टला वाचून बक्कळ लाईक्स, शेअर, कमेंट मिळायला मी काय सैराट, लैला, करीनाची-बाहूबलीची वाढती फिगर वर लिहीलं नाही. तर मी लिहीलय दररोजचं जीवन जगण्यासाठी संघर्ष करत “बळी”जाणाऱ्या “बळी “बध्दल. असो.                           

“दिसं येतीलं, दिसं जतील, भोग सरलं, सुख येईलं.”

असं म्हणत शेतकऱ्यांना “मरण”तर जगत लढावचं लागणार आहे. आत्महत्या करुन कहीही उपयोग नही कारण इथं मढ्याच्या टाळूवरच लोणी चवीनं खाणाऱ्या महाभागांची काही कमी नाही. 

 म्हणून , “जगा आणि लढा.”
                   सौ.संजीवनी क्षिरसागर मांडे.

Advertisements

4 thoughts on “तुर..टूर्…!

  1. शेतकऱयांनी कस्ट करायचे व फायदा व्यापारी लोकांनी घ्यायचा हे ठरलेले आहे
    सरकारने हमी भाव द्यायला पाहिजे व त्या भावापेक्षा कमी किमतीत खरेदी केल्यास त्यावर कारवाई होयला पाहिजे

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s