“जय हो!!”

एकदा एक माकडीण आपल्या पिलासह पाण्याच्या हौदात पडली. पाणी प्यायला गेली असेल बिचारी. अचानक हौदात पाणी भरायला लागलं, तसं तीनं पिलाला पहिल्यांदा काखेत घेतल नंतर डोक्यावर घेत त्याला वाचवायचा प्रयत्न करू लागली.पण पाणी अजूनच वाढलं. आता मात्र ते तीच्या नकातोंडात जायला लागलं, जीव गुदमरायला लागला. क्षणार्धात तीनं आपल्या पिलाला पायाखाली घेतलं आणि आपला जीव वाचवला. ही गोष्ट आपल्याला माहित आहे.

तर त्याच काय आहे की, 1965 मध्ये नेहरुंच्या मृत्यू नंतर पाकिस्तानने भारतावर हमला केला होता त्यावेळी लाल बहाद्दूर शास्त्री हे पंतप्रधान होते.त्यांनी सिमेवरच्या सैनिकांच मनोधैर्य वाढवण्यासाठी व देशात अन्नधान्याचा तुटवडा होऊ नये म्हणून रामलीला मैदानावर,” जय जवान, जय किसान” चा नारा दिला होता.त्या नाऱ्याला अजूनही जीवंत ठेवत शेतकरी शेतात खपत आहे. आपली हाडं गहाण ठेऊन अन्नधान्य पूरवत आहे तर जवानांच्या रक्ताचा देशरक्षणासाठी सीमेवर  सडा पडत आहे आणि आपल्या जखमांचे लक्तरं घेऊन त्यांच्या विधवा-मूलंबाळ जगत आहेत. सध्याची स्थीती पहाता त्यांच्या सहन शक्तिचा बांध फुटतो की काय अशी  शंकेची पाल मनात चुकचुकते हो! आणि यामुळे माकडीणी सारखा विचार यांच्या मनात आला तर…..? 

“The future of India lies in the villages.” म्हणत गांधीजींनी खेड्याच्या विकासाला प्राधान्य दिलं तर नेहरूंचा Industrialization – modernaization म्हणत शहरांच्या विकासाकडे कल होता. पण आजतागायत त्या दोघांमध्ये balance ठेवण कुणालाच जमलं नाही. वरचेवर खेडी दुर्लक्षित होऊन बकाल होत गेली. दुष्काळ,दारीद्र्यान शेतकरी पिचतचं गेला आणि आत्महत्येच सत्र सुरू झालं. त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक योजना काढल्या पण त्या त्यांच्यापर्यंत पोचता पोचता वाटेत भेटलेल्या अनेक वाल्याकोळ्यांनी गडप केल्या.आता काही चित्र पालटतय का ते बघूया कारण “वाल्याचा वाल्मिकी” बणवायची नवी योजना निघालीय असं कानावर आलयं. “Be +ve”, “देश बदल रहा है।”

भारताच्या कचखाऊ पणामुळं शास्त्रीजींनी ताश्कंद तर इंदीराजींनी बेनझीर भुट्टो बरोबर सिमला करार केला. सिमला करारानुसार दोन्ही बाजूंच्या काश्मीरमधील प्रत्येक्ष नियंत्रण रेषेला मान्यता दिली जाईल आणि काश्मीर प्रश्न सुटेल म्हणून भारत सरकारने तर संमती दिली परंतू  पाकिस्तानच्या विरोधाच्या भितीने भुट्टोंनी ते गुप्त ठेवलं परिणामतः,”आम्ही सिमला करार मानतच नाही” हे उत्तर भारताला एकाव लागतं. आपली शांतता प्रिय, सेक्युलर प्रतिमा जपण्यात भारताचे पाकिस्तान बद्धलचे ठाम धोरण ठरवण्यात गोंधळ उडतं आहे. काश्मीर धुमसतचं आहे जवानांचे बळी पडतच आहेत त्यांची विटंबना होतच आहे.”ये बलीदान व्यर्थ न जायेगा” म्हणत हे असचं सूरू ठेवायचं का? एकीकडे नक्शलवाद बोकाळायला लागलाय.  महीलांचा सन्मान तर दूरचं.

आजून एक गोष्टीची आठवण मला झाली, ती म्हणजे एकदा एक तहानलेली शेळी विहिरीजवळ आली, तीने आत डोकावून पाहीलं तर आत एक लांडगा होता. तो शेळीला बघून खूश झाला. शेळी लांडग्याला म्हणाली,” लांडगे भाऊ, मला तहान लागलीय हो. पाणी प्यायचय.” लांडगा आतीशय गोड हसतं म्हणाला,” हत्तीच्या! एवढच ना, मग ये की आत आणि पी हवं तेवढं पाणी.अगं! काय सांगू, हे अस गोड आणि गार पाणी तूला कुठचं प्यायला मिळणार नाही.” ती तहानलेली शेळी लांडग्याच्या गोड बोलण्याला भुलली आणि धडाम्! विहिरीत उडी मारली. लगेच लांडग्याने शेळीच्या डोक्यावर पाय ठेऊन विहिरी बाहेर उडी मारली. शेळीला लांडग्याचा धूर्तपणा लक्षात आला पण तोपर्यंत ऊशीर झाला होता. आसचं काहीसं ट्र्यापिंग आजच्या तरूणाईचं होत आहे. मराठा मोर्चा,गुजर मोर्चा,बहुजन समाज मोर्चा,जाट मोर्चा, जेनयु, काश्मीरात तरुणांनकडून होणारी आपल्याच जवानांवरची दगडफेक. हे अजून दूसरं काय आहे? “विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?” म्हणत world’s youngest nation’s youngesters द्विधा मनःस्थीतीत आपली शक्ति आणि बहुमूल्य वेळ खर्ची करत भरकटत आहेत.

अटलजींनी पोखरणच्या चाचणीनंतर “जय जवान, जय किसान, जय विज्ञान.” हा नारा दिला होता. 1950 च्या आसपासच विज्ञानाचे काही शोध लागले त्यानंतर आताची इस्त्रोने  सेटेलाइटची केलेली कामगीरी समाधान कारक आहे.

डॉ. कैलाश मिश्रांनी ,”जय विद्वान” हे त्या पुढे जोडलं. पण किसान आणि जवानां सारखचं पानसरे, कलबुर्गी आणि दाभोलकर या महान विद्वानांच आपल्या देशात काय झालंहे तुम्ही जाणताच. “राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय भूमीका देशहितापेक्षा मोठ्या मानल्या तर आपले स्वातंत्र्य नक्की धोक्यात येईल”असं डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं विधान  सत्यात उतरायला नको.

म्हणून सर्व राजकीय पक्षांनी स्वहीत सोडून,  जात-पात,धर्म-भेद सोडून. प्रक्षोभक विधान न करता,तरुणाईच्या शक्तिला- बुध्दिला योग्य दिशा देत तोडगा काढण्याकडे जास्त कल दिला तरच आपला देश एकसंघ राहिल आणि येणाऱ्या संकटाना समर्थपणे तोंड देईल. जसं “कॉनव्हेक्स लेंस (बहिरगोल भिंग )विखूरलेली सूर्याची कीरणं एकाच बिंदूवर आणतो तसं देशात घडणाऱ्या प्रत्येक घटना ह्या देशहीत जपणाऱ्या बिंदूवरच केंद्रित व्हव्यात”.

तरच आपण अभिमानानं म्हणू शकू,                           “जय जवान! जय किसान! जय विज्ञान! जय विद्वान! आणि जय हिंदूस्तान!”

नाही तर,                                                                  “माझी जो नाव डूबोये तो उसे कौन बचाये.”

आशीच गत होईल.
                   सौ. संजीवनी क्षिरसागर मांडे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s