मैत्रीचे-नात्यांचे ऋणानुबंध जपणं त्याला सहजतेनं व सात्विकतेनं फुलवनं ही एक सुंदर सुदृढ व आनंदी आयुष्य जगण्याची गुरूकिल्ली आहे. माणूस स्वतःला कितीही सेल्फ एस्ट्याब्लिशड् असल्याच्या भ्रमात आसला तरी त्याने कुठे न कुठे, कधी न कधी कळत नकळत कुणाचीतरी मदत घेतलेलीच असते याचा त्याने प्रामाणिकपणे स्विकार केला पाहिजे. हो ना ?
मदत, सपोर्ट असो वा आधार हे जर ऐकमेकांना निरपेक्ष भावनेने दिले तरच नात्यांचे बंध अधिक दृढ होतात.तसा मानव हा मुळात सोशल आहे पण त्यातुन तो स्वार्थ साधन्याचा सतत प्रयास करतो.त्याची सहकाराच्या भावने पेक्षा स्वार्थाची भावना जास्त प्रबळ असते.मी व माझं कुटूंब ह्या व्यातिरिक्त इतरांचा विचार तो क्वचितच करत असतो.
ह्या 2G,3G,4G च्या युगात स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी ती स्पिड गाठण्याचा मी,तो,ती सगळेच प्रयत्न करत आहोत.इथं प्रत्येक जणं झपाटल्यागत धावत आहे. कुठं? आहो दुसरं कुठं ? तिथंच जिथं तुम्ही,आम्ही धावत आहोत.एक्झ्याक्टली! पैश्याच्या,प्रसिध्दीच्या मागे पण त्यातुनही मिळालेल्या एखाद्या निवांत क्षणी आपल्यातला मन आसलेला मानव जागा होतोच, मग जणू स्वच्छ नितळ पाण्याला अचानक कुणीतरी ढवळावं आणि तळाशी बसलेल्या गाळनं स्वच्छ पाण्यात दिसणाऱ्या स्वताःच्या व निरभ्र निळ्याशार आकाशाच्या प्रतिमेला धुसर करावं असं काहिसं होतं.त्या क्षणी कंठ दाटून येतो आणि त्यात दिसते ती आपली माती-आपली माणसं.
भले कितीही शहराच्या झगमगाटात, चकचकित दूनियेत वावरत असलो तरी आपली माणसं ही हृदयाच्या कप्प्यात जतन केलेली असतातच त्यांची आठवण सतत येतच असते.
डॉलरची तुलना रुपयाशी करत विदेशात स्थिरावलेल्यांच्या मनाला तर आपल्या माणसांची आधिक ओढ लागलेली असते. अनेक वेळा त्यांना काही तांत्रीक कारणांमुळं इच्छा असूनही मायदेशी येता येत नाही. अनेक अडचणींना तोंड देत जीवन जगावं लागतं.ते आपल्या माणसांचे सुख दुःख शेअर करू शकत नाहीत व आपले कुणाशी शेअर करूही शकत नाहीत परिणामतः कित्येक जण डिप्रेशन मधे जगतात.
तसं पाहीलं तर सतत आपली आपली मणसं म्हणत त्यांच्यावर विसंबून असणारी मंडळी ही बाल्कनीत ठेवलेल्या कुंडीतल्या “बोनसाय” सारखी आसतात.ती आपल्या माणसांना गृहीतच धरून असतात कारण त्यांना सूर्यप्रकाश ,पाणि विनासायास वेळच्यावेळी मिळतं.पण तेच घरा पासुन,आपल्या माणसांपासून दूर रहाणाऱ्यांच अगदी उलटं असतं.जशी बाहेर रानात वाढणारी झाडांची मुळ ओलावा शोधत जमिनीत आत खोलवर जातात, त्यांच्या फांद्या सूर्यप्रकाशाची ऊब मिळवण्यासाठी आकाशाकडे ऊंच झेपावतात.अगदी तसचं ही माणसं मायेचा ओलावा आणि ऊब शोधत ह्या गर्दित आपलं असं कुणिही नाहिए माहित असूनही मैत्रिचे,आपुलकीचे, जिव्हाळ्याचे ऋणानुबंध जपत आपली मुळ जमीनीत घट्ट रूजवतं वाढतात-फैलावतात व दूर राहूनही शक्य असेल ती मदत करतात.ही एक त्पांनी आपल्या माणसांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञताच असते.पण कुंडीतल्या झाडांना हे जमेलं का?
शेअरींग ऑण्ड केअरिंग हे आपल्याला पुर्वी एकत्र कुटूंबात शिकवलं जायचं आणि आता आयसोलेटेड फॅमिली असल्या तरी तेच शाळेत व्ह्याल्युएज्युकेशन द्वारा शिकवुन माणसांना माणूसकिच्या नाळे सोबत बांधून ठेवण्याच प्रयत्न केला जातो. पालकांचा त्यात सहभाग असनं खरचं अतिशय गरजेच आहे. त्याने माझ्यासाठी काय केलय? मग मीचं का करू? असा विचार करून दुसऱ्यांच्या फुटपट्टिनं आपलं मोजमाप करणं म्हणजे आपलीच किंमत आपणचं कमी करणं.कारण आनंद शेअर केला तर तो दुप्पट होतो आणि दुःख शेअर केलं तर निम्मं होतं,ह्याची प्रचिती मला आली ती “The Bitter LAW” वाचून मला माझ्या बऱ्याच स्नेहिंनी म्यासेज करून, फोन करून, प्रत्यक्ष भेटून इतकचं नाही तर स्वतःच दुःख माझ्यासोबत शेअर करून मला व माझ्या कुटूंबियांनां धीर दिला.मी सदैव त्यांची ऋणी आहे आणि राहीलं.
माणसातला माणूसकिचा ओलावा ,नात्यातली ओढ कधीच आटू शकत नाही. जीवनाच्या धावपळीत जरी बोलू भेटू शकलो नाही तरी एकमेकांना बोलण्याची भेटण्याची हूरहूर ही कायम मनात असतेच.फक्त आड येतो तो “मी” तो जरा बाजूला सारला की झालं.
“If you have the power to make someone happy.
Do it.
The world needs more of that.”
सौ. संजीवनी क्षिरसागर मांडे.