तुम्ही नक्कीच अनुभवलं असेल की आपल्या डोक्यात सतत एकामागून एक विचारांचं चक्र चालूच असत. ह्या क्षणी एक विचार करतो तर दूसऱ्या क्षणी दूसरा.असे सतत येणारे विचार म्हणजेच आपला आपल्याशी चाललेला संवाद होय. जर तो अर्थपुर्ण असेल, पोसिटिव्ह असेल तर ठीक, नाही तर ते अनावश्यक विचार आपल्या डोक्यात गर्दी करतात आणि आपल्याला दमवतात.मग
कशाचं तरी वाईट वाटतंय आतून. काहीतरी तुटत चाललंय आतून. हासायचंय पण हसवत नाही. रडायचंय पण रडवत नाही. काळजात तितकी ओलच नही अस काहिस आपलं होतं.
आपल्या बुध्दिला विचारांना आपण चालना दिलीच पाहिजे, पण कितपत? हा ही प्रश्न येतोच ना!.आपण कुणाचा, कशाचा आणि का विचार करायचा ह्याचाही विचार करणं तितकच आवश्यक आहे. नुसता विचारांचा फाफट पसारा डोक्यात जमवणं म्हणजे डोक्याचं डंपिंगग्राऊंड करणं.
परवाच आम्ही आमच्या घराच्या हॉलला नवी लादी बसवून घेतली. आर्थातच काही लाद्या फूटल्या होत्या म्हणून. दनादन घाव घालून कारागीरानं फूटलेल्या लाद्या सोबत अख्ख्या चांगल्या लिद्यांचांही हतोडीन चूरा केला. पोत्यात भरल्या.त्याच ही डेब्रि बनवलं.अगदी आपलही असचं होतं. जरा काही मनासारखं झालं नाही, कुणी मनाला लागेल असं बोलल की आपण ब्रेक होतो आणि त्या विचारांच्या चक्रात आपल्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या घटनांचा आनंद घेत नाही आणि त्यांचही आपसूकच डेब्रि बनवतो.
नकोशा घटनांचा सतत विचार करून, त्यांना आपल्या डोक्यात साठवून डोक्याच डंम्पिंग-ग्राऊंड बनवतो. नेमकं जेंव्हा आपल्याला काही तरी सॉलिड करुन दाखवायची संधी मिळते तेंव्हा हे डेब्रि आपल्यातल्या क्रिएटिव्हिटीच्या फ्लोला चोक अप करतं.आत्मविश्वास कमी होतो. कुठतरी न्युनतेची पाल मनात चुकचुकते मग झाल! गेली संधी. मग “ये रे माझ्य मागल्या”
परत नकोत्या विचारांचा भडीमार सूरू होतो.आपला वैरीही जी हानी आपल्याला पोहचवू शकत नाही ती आपल्याला आपण केलेले वाईट विचार पोहचवू शकतात.एखाद्या प्रेझेंटेशनसाठी आपण केलेली तयारी चोख असली तरी मनात विचार येतोच,”ऐनवेळी पेनड्राईव्ह चालेल ना?”
दहादा मुलाकडून पाठ करून घेतलेली कविता असते तरी आई त्याला शाळेत जातांना,”मध्येच विसरू नको हं!” आशी ताकीद देतेच. पोसिटिव्ह विचारांच्या तुलनेत निगेटिव्ह विचारांकडे आपण आपल्या मनातील भीती मुळे जास्त आकर्षित होतो. हेच विचार आपल्या प्रगतीत बाधा आणतात. त्यांना आपण आपल्या वरच्या विश्वासानं आणि सद्सदविवेक बुध्दिन दूर करू शकतो.
हे नकोते विचार म्हणजे डेब्रि. म्हणजे बघा, ऊन्हाळ्यात मस्त ग्लास भरून कलिंगडाचा थंडगार ज्यूस पिण्याचा आनंद घेत आसताना स्ट्रॉ मधे कलिंगडाचा तुकडा अडकतो.मग काय? तुम्ही एकतर स्ट्रॉ बदलणार.नाही तर ती झटकणार. हां !आगदी तसच आपण आपल्या नकोश्या विचारांना झटकलं पाहिजे.
डोक्यात येणारे वाईट विचार जर थांबवुच शकत नसालो तर इतकं करायच की त्यांचा जास्त खोलवर विचार करून विष्लेशण करायच नाही. ते येतील आणि एखाद्या ढगासारखे तरंगत निघूनही जातील. कालांतराने त्यांचा आपल्याला विसरही पडेल. पण जर आपण स्वतःला दु:ख, भीती, चिंता, पैसा, नौकरी, अपमान.अशा एक ना अनेक विचारात गुरफटून ठेवल तर हळूहळू त्याच रुपांतर OCD म्हणजेच obsessive compulsive disorder मध्ये होत.म्हणून “STOP OVER THINKING!”
हे ईश्वरानं दिलेलं जीवन नुसत जगायचं नसतं त्याला सजवायच असतं सजवताना एक लक्षात ठेवायच असतं सजवतांना कुणीतरी हव असतं.
हे कुणीतरी म्हणजे आपणच. आपले चांगले विचार. इतर कुणी नव्हे!
सौ. संजीवनी क्षिरसागर मांडे