हर लास्ट रेन “फॉल”

बाहेर आभाळ गच्च भरूनं आलं होत. काळ्याकुट्ट ढगांनी आकाशात दाटी केली होती. विजांचा लखलखाट क्षणभराच्या विश्रांती नंतरचा ढगांचा गडगडाट, सोसाट्यचा सुटलेल्या वाऱ्याबरोबर तुफान पावसाच्या सरी. अस वाटतं होतं की हा पाऊस महाप्रलय घेऊन येणार. पण अर्ध्या एक तासातच पाऊस थांबला. आकाश निरभ्र झालं. टच्च भरलेली ओथंबून वाहणारी गटार सभोवताली साठलेल्या पाण्याचा निचरा करण्यात गर्क झाली. तोच परत आभाळ दाटून आलं अगदी तस्साच तुफानी पाऊस कोसळायला लागला. अस वाटतं होत की जणू काही हे ढग कुठूनतरी बादलीत पाणी भरुन आणत आहेत आणि त्या एकसाथ रीत्या करून परत त्या भरायला जात आहेत. पण कधी जर पावसान मनावर घेतलं तर त्याचा मुक्काम आठवडा-पंधरा दिवसाच्यावरही जायचा. वातावरण कुंद व्हायचं. हा असा पडणारा पाऊस माझ्यासाठी अप्रूपच होतं.तो मी तासंतास खिडकित बसून एन्जॉय करायचे, कारण हा माझा लग्न होऊन मुंबईत आल्यावरचा पहिलाच पावसाळा होता.
  आसच एक दिवस पावसानं सकाळपासूनच हजेरी लावली होती. तो संततधार कोसळतचं होता. त्याच्या मनातं आज काहीतरी वेगळचं आहे अस उगाचं माझ्या मनाला वाटतं होतं. रात्रीचे जवळपास आठ-साडेआठची वेळ आसेल पाऊस कोसळतचं होता.एरवी शांत आणि दार बंद असलेल्या शेजारी धावपळ सूरू झाल्याच जाणवलं. मी दार उघडून पाहिलं, माणसांची गर्दी आणि धावपळ वाढतच होती. नक्की काय झाल असेलं याचा अंदाज येत नव्हता. मी धाडस बांधल आणि अपरिचीत गृहस्थाला विचारलच,”आहो, ह्यांची परी हरवलीय!” तो क्षणात सांगून निघून गेला.

त्या दिवशी आख्खी रात्र आमचा डोळ्याला डोळा लागला नाही, बाहेरचीही वर्दळ थांबली नाही की पावसानेही उसंत घेतली नाही.भर पावसात पोलिसांच, घरच्यांच शोधकार्य सूरूच होतं. परीच्या आई-बाबाची आवस्था कशी आसेल या विचारान माझ्या पोटात गोळा येत होता.

सकाळ झाली परीचा शोध लागला आसेल या आशेन मी तीच्या घरात गेले. सगळ कस शांत शांत होतं. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं, फक्त काळजीन काळवंडलेले चेहरे एकमेंकांकडे बघत होते. मी माघारी फिरले, घरी आले. परीचा चेहरा काही केल्या माझ्या डोळ्यांपुढून जात नव्हता. मला आजही आठवतय त्या दिवशी तीने नेहमी प्रमाणे हातात भलमोठ्ठ टेडी घेतलं होतं. पावसात भिजूनये म्हणून तीच्या आईनं परीसोबत टेडीलाही रेनकोट घातला होता. काळेभोर टपोरे डोळे, किंचीत बसक नाक, गोबरे गोरे गाल आणि त्यावर रुळणाऱ्या कुरळ्या केसांच्या स्प्रिंग सारख्या बटा. सतत मानेच्या झटक्याने मागे सारत आईचा हात धरुन ती बेबीसिटिंग मध्ये गेली होती.

  पावसाचा जोर आज जरा कमी होता.घड्याळीचे काटे तीच्या नेहमीच्याच गतीन फिरत होते पण का कोण जाणे मला ती ही परीच्या विचारान स्लो झालीय असं वाटल. अचानक काळ्याभोर ढगांना चिरत आलेल्या सूर्यकिरणांच्या तिरीपेन माझ्या मनात काही तरी शुभसंकेत मिळतील आशी आशा  जागृत झाली, पण क्षणार्धात काळ्याकुट्ट ढगांनी सुर्याला गिळंकृत केलं. काळजात धस्स झालं. “ऑल इज वेल” म्हणत मी सुस्कारा सोडला.

  संध्याकाळ झाली, रात्र झाली तरीही सर्व शांत शांतच होत, तीतक्यात आकाशात विज चमकली आणि त्याच क्षणी एक आर्त किंकाळी कानावर पडली, ढगांचा गडगडाटही त्यात विरुन गेला. मी धावतच परीच्या घरात गेले. परीच्या घरात रडारड सूरू झाली होती. तीची आई बेशुध्द पडली होती तर तीचे बाबा शुन्य नजरेन पुढे ठेवलेल्या गाठोड्या कडं बघत होते. माझी नजर गाठोड्यातून डोकावणाऱ्या परीच्या निष्पाप-निष्प्रण चेहऱ्याकड गेली. एरवी अनेक प्रश्न विचारून आईला भंडावुन टाकणारी परी आता शांत होती. पण जाता जाता ती एक मोठ्ठ प्रश्नचिन्ह सर्वांसमोर ठेऊन गेली.

 प्रत्येक जण परीसोबत काय झालं आसेल?कस झालं आसेल? ह्याचे फक्त अंदाजच बांधत होता. घडलेल्या घटनेची खरी माहिती कुणालाच नव्हती.

   तिसऱ्या दिवशी वर्तमान पत्रात फ्रंटपेजवरच परीची न्युज तीच्या फोटोसकट प्रसिध्द झाली होती. मी पेपर हातात घेतला आणि तो वाचायला सुरूवात केली,”_____येथील दोन वर्षाची चिमूरडी गटारात मृत आवस्थेत सापडली. ” मी धीर न सोडता पुढची सविस्तर बातमी वाचायला लागले,”पोलिसांच्या तपासात हाती आलेल्या महिती प्रमाणे चोवीस तासापुर्वीच पाण्यात बूडुन तीचा मृत्यु झाला आहे. तीच्या आईच्या म्हणण्यानुसार परीला तीच्या आईने नेहमी प्रमाणे सकाळी ठीक नऊच्या दरम्यान पाळणाघरात सोडलं आणि ती ऑफिसला गेली. तीला साधारण संध्याकाळी पाचच्या आसपास “परी घरात नही, सर्वत्र शोधल पण कुठेच सापडत नाही”, आसा पाळणाघराच्या काकींचा फोन आला.पाळणाघराच्या काकींच्या चौकशीत अस समोर आलं की,”त्यांनी परी सोबत इतर चार मुलांना नेहमी प्रमाणे झोपवलं. ती झोपल्यावर दार पुढ करुन त्या शेजारच्या मावशी सोबत गप्पा मारत बसल्या. बाहेर पाऊस कोसळतचं होता. त्या घरी आल्यावर बघतात तर दार सताड उघड दूसरी मुलं झोपलेली होती पण परी तीच्या आंथरूनात नव्हती. शोधाशोध केली पण परी नाही सापडली म्हणुन त्यांनी परीच्या आईला फोन  लावला.” 

दुसऱ्या दिवशी पोलीसांना परी पाळणाघरा शेजारील गटारात मृत आवस्थेत सापडली.

   माझा नकळतच हात माझ्या पोटावर गेला. मला त्यावेळी दिवस गेलेले होते आणि माझं ही इतर स्रीयांप्रमाणे नौकरी करण्याच स्वप्न होतं. पण आता…. 

 पाळणाघर चालवणाऱ्या काकींना तर शिक्षा झाली. पण परीन जाता जाता आपल्य पुढे ठेवलेला प्रश्न अजूनही तसाचं आहे.           

 मीरा राजपूत ने अशातच सदर स्टेटमेंट देऊन वर्किंग विमनच्या विश्वात खळबळ माजवली आहे. ती म्हणते ,”I love being at home, I love being a mother to my child, I wouldn’t want to spend one hour a day with my child and rush off to work, why did I have her? She is not a puppy; I want to be there for her as a mother.” हा तीचा पर्सनल ओपिनीयन आहे. So cool down guys! 

 ज्यांना नौकरी करायची त्यानं ती करावी पण मूलांच्या संगोपनाच योग्य नियोजन करूनच.

निश्चितच पाळणाघर, बेबी सीटिंग्स् वा डे केअर म्हणून आकर्षक पाट्या लावून ठिकठिकाणी ऊभे राहिलेले हे भूछत्र महिलांच्या नौकरीसाठी -करियर साठी सपोर्ट सीस्टिमच आहेत,हायटेक होत आहेत. ते “मनी अर्निंग सेंटर “न होता त्यात हवय ” मुलांप्रती आपुलकीचा आणि मायेचा ओलावा.”

                                                                         प्रत्येक आई  हाय प्रोफाईल असो, मिडलक्लास असो का वर्किंगक्लास असो ती,

     ” चंदा है तू, मेरा सूरज है तू।”म्हणत आपल्या मूलांमध्ये भविष्याचे स्वप्न रंगवत आसते नाही का?

“Children are too precious to be lost, So we should pay attention towards their holistic development.”
         

                  सौ. संजीवनी क्षिरसागर मांडे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s