“बि बोल्ड् फॉर द चेंज”

प्रिय सखी, महिला दिनाच्या तुला हार्दिक शुभेच्छा. ईन एडव्हांस्  कारण येत्या बुधवारी, ८ मार्चला तुझ्या सारखीच मी ही बिझी आसणारेय.
 दर वर्षी ८ मार्चला शाळा, कॉलेज, ऑफिसेस, महिला मंडळ इतकच नाही तर महिला व बालकल्याण विभाग हे दिवसभर अगदी भरगच्च कार्यक्रम आयोजित करून आपल्याला प्रोत्साहन देतात. म्हणूण मी ही माझ्या मैत्रिणीसोबत वाशीच्या विष्णूदास भावेला हजेरी लावते. महिला दिन म्हटला की रांगोळी स्पर्धा, वाक्तृत्व असो का निबंध स्पर्धा त्या सर्वांचा विषय हाच महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण वा स्रीभ्रूण हत्या.

    दोन मार्चला स्पर्धांच ऑडिशन होत. ऑडिशनला येताना तु अतिशय उत्साहात घरचं आवरून जय्यत तयारीनिशी विष्णूदासला आली होतीस. तुझ्या पाठिवरची स्याक तर डोरेमॉनच्या पाऊच सारखी जादुई होती. तु तुझ्या मुलांना आणि तुला हव्या असलेल्या वस्तू अगदी क्षणात काढत होतीस. खरच! सॉलिड तयारी हं !

    गेली पाच-सहा वर्षापासून आमचा ग्रुप महिलादिनी नाटक सादर करतोय. आमचा ऑडिशनचा नंबर यायला वेळ होता म्हणूण वाक्तृत्व स्पर्धेच्या ऑडिशन हॉल मध्ये आम्ही बसलो.आय याम एक्सट्रिमली सॉरी! तीथं बसणं मला कंटाळवाण वाटत होतं. प्रत्येक सखी तेच ते मुद्दे मांडत होती. पण त्यातुनही फॉशनेबल टिपटॉप दिसणाऱ्या सखीपेक्षा साडी नेसून, केसांना तेल चोपडुन वेणी घातलेल्या सखीनीं मांडलेले मुद्दे मनाला जास्त बोचले. त्यांच्या वाक्तृत्वात आलेली सहजता ही त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनुभवलेल्या प्रसंगामुळेच आली असावी.

   मी काय म्हणत होते? तर हं! सखी, आपण अगदी हिरीरिने स्पर्धेत सहभाग घेऊन दर वर्षी आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची उजळणी करतो आणि प्रेक्षकांकडून टाळ्याही मिळवतो. खरचं तुला वाटत यातून काही निष्पन्न होणार आहे? नक्कीच नाही, कारण सखी आपली सध्याची स्थिती पाहता, कालानुरूप आपल्या विश्वात फार काही बदल झालाय अस चित्र दिसत नाही. हे कार्यक्रम फक्त आपल मनोरंजन करतात इतकचं.

   आमच नाटकाच ऑडिशन फर्स्टक्लास झाल. दरवर्षि प्रमाणे याही वर्षी प्रथम पुरस्कार आम्हिच पटकवणार अशा आत्मविश्वासान संध्याकाळी जवळपास  सात-साडेसातला घरी पोहचलो. पोटात कावळे ओरडत होते. ऑडिशन चांगल झाल होत म्हणूण माझा मुड जरा बरा होता. मी घरी पोचण्याआधीच माझा नवरा घरी पोचला होता आणि तसाच होतात फोन घेऊन तर मुलगा नेहमी प्रमाणे ट्याबवर गेम खेळत सोफ्यावर तंगड्या पसरून बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होत की त्यांच्या पोटात भुकेचा डोंब उसळलाय. पण माझ्या मुलीनं मात्र माझी विचारपुस केली. बर वाटलं.

 मी फटाफट फ्रेश झाले आणि स्वयंपाकाला लागले. फ्रिज उघडून पाहिल तर काय त्यात मला एकुलती एक भाजी ती ही मेथीची जुडी दिसली. आता ती निवडायला घ्यावी तर वेळ लागणार. काय कराव? हा विचार करत हॉलमध्ये आले. पहाते तर ते दोघेहीतसेच बसलेले होते. आता मात्र दिवसभर महिला सक्षमीकरण ह्या विचारान भारावलेली माझ्यातली स्री जागी झाली. हातातली मेथीची जुडी टेबलवर ठेवली आणि दोघांनाही ती ताबडतोब साफ करून द्यायच फर्मान सोडलं. त्यांच्यासाठी हे आनपेक्षीत संकट होत, पण काय करणार? माझा आवतार पाहून दोघेही निमुटपणे मेथी निवडायला बसले. त्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते, कारण भाजी  कशी निवडायची माहित तरी होत का त्यांना? मी किचन कडं वळले इतक्यात माझी मुलगी माझ्या आवाजाने अभ्यास सोडून रुममधून बाहेर आली. तो “भुतो न भविष्यती” प्रकार पाहून झट्कन म्हणाली,”मम्मी! धिस इज कॉल्ड पूरूष सक्षमीकरण”. अरे हो, एक्झ्याक्टली! 

अं…सॉरी ,काय म्हणालात? असच ना की आम्ही बसतो घरात स्वयंपाक करत आणि तुम्ही……आहो! नाही हो अस मला अजीबात म्हणायच नव्हत. मी बाई तुमच्या काळजी पोटीच म्हणाले हो! बघा त्याच काय आहे, बायको माहेरी गेली की होतात ना पोटापाण्याचे वांदे म्हणूण. हॉटेल! आहेत ना, मग खा खुशाल पोटाला परवडत असेल तर . आहो जाऊ द्या! मस्करीचा भाग सोडला तर ,खरचं आहे की, काय हरकत आहे स्त्री सारखं घरातली आणि बहेरची कामे पुरूषांनी सक्षम पणे करायला?आणि आपल्या बायकोचे विचार, स्वप्न व महत्वकांक्षा समजून घेऊन त्यात रंग भरायला.

  ऑडिशन मध्ये मला प्रकर्षान जाणवलं की प्रत्येक सखीच्या वक्तव्यात आपल्या सोबत होणाऱ्या अपराधिक घटनांची सल होती आणि निषेधही होता. ह्या घटनांवरून सखी तुझ्या सक्षमतेची चाचणी होऊच शकत नाही कारण हे घडण्यामागे समाजाची तुझ्या भावना समजून घेण्या प्रतीची असक्षमता कारणीभूत आहे. तुला एक माणूस म्हणूण बघीतल गेल पाहिजे ना कि वासना आणि विटंबनेच प्रतिक.

  मला माहित आहे तुला स्वातंत्र्य आणि स्वैराचारातला फरक माहित आहे, आणि तू समर्थ आहेस तूझी काळजी घेण्या साठी फक्त ते तुला स्वताःला कळल पाहिजे तू नकळतच आपल्या पेक्षा समाजाला अधिक महत्व देतेस आणि तो तुझ्यावर वर्चस्व गाजवायला लागतो, बंधन लादायला लागतो.वैचारीक पातळीवरील समाजाच्या सक्षमीकरणातूनच त्याचा तूझ्या कडे बघण्याचा दृष्टिकोन प्रगल्भ होईल.

  दर वर्षी प्रमाणे येणाऱ्या प्रत्येक ८ मार्चला आपण हिच चर्चा करत महिला दिनाचा उत्सव साजरा करायचा का प्रत्येक दिवस हा महिला दिन म्हणूण साजरा करायचा?हे तूझं तुलाच ठरवायचय.

        सो, बि पॉझिटिव्ह्!

सरकार आणि पुलिस यांवर अवलंबून न रहाता समाजात रुळलेल्या परंपरा आणि अन्यायाविरुध्द लढा देण्यासाठी                             “ऑल द बेस्ट!”   

              ” बि बोल्ड् फॉर द चेंज.”                       

             सौ.संजीवनी क्षिरसागर मांडे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s