कोच नंबर “6”

मी आणि माझा मुलगा दिवाळीच्या सुट्टित नांदेडला जाण्यासाठी ठाण्याहून नंदिग्राम (ट्रेन). मध्ये बसलो. आमच्या कंपार्टमेंट मध्ये आम्ही दोघेच होतो. आम्ही फटाफट आमच्या ब्याग्स ठेवल्या. मी वाचण्यासाठी नॉव्हेल तर माझ्या मुलाने नेहमी प्रमाणे गेम खेळण्यासाठी ट्याब काढला. आ..हा..छान प्रशस्त वाटतं होतं. कधी कल्याण आलं ते कळलं सुध्दा नाही. गाडी थांबली प्रवासी गाडीत चढायला लागले. मोगरऱ्याच्या सुगंधान कंपार्टमेंट दरवळलं. मी वाचता वाचता वर पाहिल तर एक सुंदर स्री मोगरऱ्याच्या फुलाच्या वेण्या आपल्या  लांबसडक वेणीत माळून पाठमोरी ऊभी होती. चला!आपल्याला प्रवासात सुंदर सोबत आहे, मला हायस वाटलं.मी परत पुस्तकात डोकं खुपसलं. तितक्यातं आरडाओरडा करत ब्यागा घेऊन काही जणी धडाधड आत शिरल्या. मी पापण्या उचलून वर बघितलं आणि माझे डोळे खुलेच्या खुलेच राहीले. प्रयत्न करूनही बंद होईनात. ती पाठमोरी स्त्री किंचित झुकून माझ्याकडे बघून गोड स्माईल देत होती, मी सर्वत्र नजर फिरवली. मला आस वाटलं की जणू कुणीतरी मधमाशीच्या पोळाला दगड मारलायं, आणि ही राणी माशी माझ्याकडे   घोंगावत येत आहे, बाकीच्या तीच्या मागुनं. अशी थ्रिडी इमेज माझ्या डोळ्यापुढे आली. माझ्या हातातलं पुस्तक केंव्हाच गळून पडलं. अरे!काय आवस्था झाली होती माझी म्हणूण सांगू. मी माझ्या मुलाकडं पाहील तर त्याचीही गत माझ्या पेक्षा काही वेगळी नव्हती. “जनरलची तिकीट काढाली तर अस्सच होणार “.असचं तुम्हाला वाटत असणार. आहो नही हो! टु टीअरची तिकीट, तेही तब्बल दोन महिन्यापूर्वी काढली होती.काय सांगू, ए.सी.मध्येही घाम फुटला होता आम्हाला.तिच्या ते बरोबर लक्षात आलं. तिचे ते लिप्स्टिक लावलेले जाडेभरडे ओठ अधिकच रूंदावले आणि काजळ लावलेले बटबटित डोळे चमकले. आता तर माझी पार वाट लागली. “अरे दीदी आरामसे बैठो ” म्हणत ती माझ्या सीटवर बसली. बहुदा तो त्यांचा गुरू होता. “टेन्शन मत लो” म्हणत परत हसली, “ऐ..स्वीटी चल चल सामान लगा फटाफट”. तिने ऑर्डर दिली. स्वीटी भडकलेलीच होती, “ऐ..छि** किधर देखरी रे? ऐ डॉली, मै तेरेकोच बोलरी रे. दे! दे फटाफट समान दे!” ” ले ले रां* आज तेरेकु मेराईच भेजा मिला था क्या खाने कु”. म्हणत डॉलीन स्वीटीकड सामान ढकललं. त्यातली एक तर कानाला हेडफोन लाऊन लांबलचक वेणीचा गोंडा हातान हलवत मध्येच टाळ्या वाजवत नाचत होती. त्यांच्या  आवाजानं माझा हार्ट फेल होतो की काय असं झालं मला. या वर्णणावरुन तुम्हाला अंदाज आलाच असेल ती मोगऱ्याची वेणी कुणी माळली होती. नाही!आहो किन्नरानं. चक्क किन्नरांच्या सोबतीन प्रवास करत होतो आम्ही.ते ही दहा बारा”त्यात काय?” म्हणता “काहीही हं!” तुमचीही अवस्था माझ्यासारखीच झाली असती त्यावेळी. मग? मग काय? माझ्यापुढे मोठ्ठा प्रश्न ऊभा राहिला होता आणि तो म्हणजे रात्रभर प्रवास कसा करायचा? टि.सी.ला बोलून  काही अरेंजमेंट होते का ते बघायंच. सिम्पल! असच ना! हाच सल्ला आमच्या ह्यांनी ही मला दिला होता फोनवरुनं. पण तो काही फीरकलाचं नाही. मग काय? बसले तिथचं.  विचार केला अरे यार! हे ही तर माणसचं आहेत ह्यांनाही काही भावना असतीलच की, कदाचीत ते अशा भडक आणि वरवर उथळ दिसणाऱ्या हालचाली  आत खोलवर काळजात दडलेल्या दुःखाचा कल्लोळ शमवण्यासाठी तर करत नसतीलं?. मी मनाशी ठरवल आज यांच्या सोबत प्रवास करून बघुया, एक नवीन अनुभव घेऊया.

इतक्यातं फोनची बेल वाजली. राणीन फोन उचलला.”हॉलो” एवढच कळलं मला त्यांची भाषा अनोळखी होती. बहुधा तिच्या घरचा फोन होता. तिने “आम्मा” म्हटलं आणि तिच्या काळ्याभोर डोळ्यात पाणी तरारलं. ते तिने तिच्या लांबसडकं लालचुटूक नेलपेंट लावलेल्या बोटानीं मोठ्या नजाकतीनं टिपलं तेवढ्यात फोन कट झाला. तिने आवंढा गिळला आणि बेफिकरीन दूसऱ्याच क्षणी कानाला हेडफोन लावून आपल्याच मस्तीत गात नाचायला लागली. आता तिने लावलेला सूर आणि धरलेला ठेका काही औरच होता. किती विलक्षण कला होती तिची दूःख पचवायची.

देवाने दिलेला जन्म भले कसाही असो ते त्याचा सन्मान करतात.ते त्यांचा देह काय खुबीन सजवतात. आपण जसे आहोत तस एक्सेप्ट करुन आयुष्य जगण हे सोप नाहीये.

मी हळूहळू रिल्याक्स व्हायला लागले. माझा मुलगा अजुनही तोंड फुगवून बसला होता. “कुठं जायचयं तुम्हाला दीदी?” गुरुन आदबीन विचारलं. मी “नांदेडला” म्हणाले.”तुम्हाला?” मी विचारलं. “आंध्रात, गुरुदर्शनासाठी.”, तो म्हणाला. मनमाड आलं त्यांनी खाण्याचे डबे काढले.”दीदी खाना खाओगी”, गुरु म्हणाला. मी हातानेच नकार दिला. त्यांच्या जेवणात बिफ पासून ते ठेचा भाकरी पर्यंतचा मेनू होता. नॉनव्हेजचा वास माझ्या मस्तकाला भिडला तशी मी भडकले.”अरे,आपको पता नही पब्लिक प्लेस में ऐसा कुछ खाते नही.” मी नाकाला रुमाल लावला.स्वीटी शांतपणे म्हणाली ,”सॉरी दीदी”. मग मी काय बोलणारं?.  “घ्या नवा अनुभव “मनाशी पुटपुटत तब्बल तासभर रुमालात नाक कोंबून बसले.  माझी तर भुकच मेली आणि माझा मुलगा तसाच झोपला. त्यांचीही बडबड हळूहळू मंदावली.

मी मात्र अजून जागीच होते.खरचं, हे किन्नर आयुष्यभर त्रिशंकू आवस्थेत कसे न डगमगता जगतात. आपण भले ही दृश्य स्वरूपात त्रिशंकू आवस्थेत जरी नसलो तरी आयुष्यात अनेकदा त्रिशंकू मनस्थितीत जगतो व सैरभैर होऊन नैराश्याला सामोरे जातो. समाजात ,आपल्यात राहुनही एकाकी पडतो आणि हे! एकाकी असुनही आयुष्यात येणारऱ्या प्रत्येक दुःखाला सहजच ठेंगा दाखवून जीवन जगतात. जगाच्या नजरा त्यांना बोचत असतीलचं तरीही ते मस्तमौला जिंदगी जगतात. त्यातले काही अपडेटेड होते.सहज स्मार्टफोनचा वापर करत होते.त्यांच्या बनवलेल्या लाईफस्टाईल कडं बघून जाणवलं की ते इतरांकडुन सहानुभूतीची अपेक्षाही करत नसतील .भले जग त्यांना काहीही म्हणो पण ते स्वतःला मंगलच समजतात आणि सदैव मंगल प्रसंगातच सहभागी होतात. त्यांच जीवन शापित असलं तरी इतरांना आशिर्वाद देतं म्हणतात,

“सज रही गली मेरी माँ सुनहरे गोटे में”                    महेमुदच्या “कुवांरा बाप “च गाणं आहे हे.

त्यांच्यातल्या जीवना प्रतिच्या पॉझिटिव्ह एटिट्युडला माझा सलाम!

 

                       सौ.संजीवनी क्षिरसागर मांडे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s