द ब्रेकअप ब्लॉग

मी ज्या जीममध्ये जायचे तीथं एका नवीन मुलीनं जीम जॉईन केल. तीला बघताचं मी तीच्याकडे बघतचं राहिले. खर, सरळ सरळ सांगू मी तीच्या रूपाच्या प्रेमात पडले. ती होतीच एवढी सुंदर. गुलाबी गोरापान रंग. देव देतोच असा रंग यांना कसा राव? बर एवढचं नाही तर न्याचुरल गोल्डन ब्राऊन केस, बोल्ड अन कॉन्फिडंन्ट. त्यावर सुंदर पण थोडासा स्थूल झालेला बांधा. आहो! स्थूल म्हणजे तसा नव्हे काही. कामाच्या व्यापामूळ थोड होतं फिगरकडे दूर्लक्ष. डाळिंबी ओठ, उंचपूरी. तीच्या व्याक्तिमत्वाला बघून माझ्या मनात इन्फेरिओरिटी कॉम्प्लेक्स तयार झाला. ती सरळ माझ्या शेजारच्याच ट्रेडमिलवर आली आणि येताच माझ्याकडे बघून एवढी गोड हसली. काय सांगू मला क्षणभर काहिच सुचलं नाही. ती लगेच मला ‘हाय!’ पण केल.आवाज पण सॉलीड गोड होता तीचा. मी आवघडल्यासारख्या मुद्रेन तीला ‘हाय!’ म्हणाले. माझ्या मनात आल, ही माझ्या ओळखीची ना पाळखीची सरळ येऊन एवढ्या आत्मियतेने हसून मला ‘हाय!’ करते म्हणजे नक्कीच मी तीला मगाचपासून वेड्यासारखी बघतेय हे तीच्या लक्षात आलयं वाटतं. मी थोड स्वतःला सावरलं आणि आपल वर्क करायला लागले.
तो अख्खा दिवस ती माझ्या डोक्यतून गेलीच नाही. नंतर आमची चांगलीच गट्टी जमली. बोलण्याच्या ओघात तीने तीच लग्न होणार आहे अस सांगीतल. एक्झ्याक्टली! लव्ह का अरेंज? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, आय एम सॉरी! ते  वीचारायचं माझ्या डोक्यातचं आल नाही.

पुर्वी कंटाळवाण वाटणारं जीम मला आता तीच्या गोड चिवचिवाटामुळ आवडायला लागलं. मी ही जरा शेप मध्ये यायला लागले आणि ती तर अगदी ‘बेबो’ दिसायला लागली.

एकदा आम्हां दोघीनां सोबतच जीम बाहेर पडण्याचा योग आला. बाहेर एक तीच्या तोडीस तोड एकदम हँडसम स्टाईलिश “वॉव” मुलगा बाईक घेऊन ऊभा होता. त्याने मला “वॉव” स्माईल दीली. बहूधा तीने माझ्याबध्दल त्याला सांगीतलं असाव. ती धावतचं त्याच्या पाठीमागे बसली आणि धूम स्टाईलने गाडी चालवत ती जोडी दिसेनाशी झाली.

त्यांच लग्न झालं. शाहीच लग्न झालं आसणारं. आसणारं म्हणजे? मला आमंत्रण होतं पण मी नाही जाऊ शकले. कारण! कारण सासऱ्यांच डोळयाच ऑपरेशन झालं त्यातच ह्यांच्या आत्याच्या मुलीच लग्न, नंणदेच्या घराचा वास्तू.घरात पाहुणेच पाहूणे होते….आहो जाऊ द्या हो! आता तो विषय महत्वाचा नाहीये. तर मी काय सांगत होते…? हां! तर तीने शेअर केलेल्या फोटोवरून आणि तीने माझ्या बरोबर केलेल्या शॉपींगच्या चर्चेवरून मी अंदाज बांधला. करोडोचा चुराडा झाला असणारं. नक्कीच!

सहा महिन्यानी ती मला भेटली.अगदी तसाचं तीचा चिवचीवाट सूरू झाला आणि बोलता बोलता मी काही विचारायच्या आत आमचा “डिव्होर्स होणार आहे”अस तीने सांगीतलं. आहो खरंच! अक्षरशः सहज! मी तर उडालेच. जस्ट सहा महिन्यात खेळ खल्लास! गेली जवळपास वर्षभरापासून म्हणजे तीला भेटलेल्या क्षणापासून माझ्या मनात आलेला कॉम्प्लेक्स फटक्यात फूर्र….झाला. अरे अस कस शक्य आहे हे! लग्न म्हणजे देवानं स्वर्गात बांधलेली गाठं आणि ती टिकवून ठेवायच काम दोघांचही आसतं. लग्न म्हणजे दोघांनी पाहीलेल्या स्वप्नांचा सोहळा.हा असा कसा काय उधळून लावायचा? अश्याने तर लग्नसंस्थाच धोक्यात येईल. खरतरं नात हे मनाच्या हळव्या धाग्याने आणि विश्वासाच्या मजबूत धाग्याने गुंफायचं असतं. मनात घर करायला कित्येक वर्ष लागतात पण तीच दुभंगायला एक क्षण पुरेसा आहे. एकदा दुभंगलेली मन परत पुर्वीसारखी जूळन शक्य आहे का?

“कितने भी तू करले सितम” ऐकमेकांना म्हणतं गेली वीस वर्षे (सुखाचा) संसार करतोय ना आम्ही, आणि ह्याचं कहीतरी वेगळच चाललयं. बेबोच्या विचारानं आता माझ्या डोक्याचा पार बुगा पडायला लागला होता. इतक्यातं “आली कुठूनशी कानी” कुठूनशी काय! माझ्या शेजारुन रस्त्याने कानात हेडफोन लाऊन गाण गातं एक तरुणी चालली होती ती धुन. ऐकायचीय तुम्हाला तर ब्रेक अप सॉंग ऐका नहीतर …. हे वाचा…

“दिलपे पत्थर रखके, मुंह पे मेकप कर लिया।                  मेरे सैयांजीसे आज मैने ब्रेक अप कर लिया ।”

मी स्वताःला सावरत स्वतःशी पुटपुटले….

जस्ट चील्….! 
                     सौ.संजीवनी क्षिरसागर मांडे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s