“जीवन गाणे गातच रहावे”

दिवे लागणीची वेळ होती. मी घरतील दिवे लावले आणि क्षणभरात घरातील सगळ्या दिव्या भोवती भिरभिरणारी पतंगच पतंग. आख्ख्या घराचा ताबा त्यांनीच घेतला. मी फटाफट खिडक्या बंद केल्या आणि घरातील सगळे दिवे मालवले तसे पतंगाचे भिरभिरने थांबले. कुण्या खट्याळ मुलाने आचानक येऊन “स्ट्याच्यु “म्हणाव अगदी तसे ते स्तब्ध झाले. घरभर काळोख पसरला. मी बाहेर डोकावलं तर बाहेरही रस्त्यावरील दिव्या भोवती पतंग भिरभिरत होते. मी प्रकाशासाठी मेणबत्ती पेटवली आणि लगेच त्यांनी मेणबत्तिच्या प्रकाशाकडे झेप घेतली त्यातील काहींचे पंख भाजले पण त्यांची अंधारातून प्रकाशाकडे झेपावण्याची जिद्द काही कमी झाली नाही. मी फटाफट सगळे दिवे लावले तसे परत ते दिव्याभोवती फेर धरून भिरभिरायला लागले. असतचं अस किती त्यांच आयुष्य जेम तेम एका ते दोन दिवसांच तरीही ते असे आनंदान बागडत होते जणू त्यांना माहितच होत की त्यांना मिळालेल्या क्षणभंगूर जीवनच गाणं गात जगायचयं. जगण्याचा सोहळा करून मरणाला लाजवायचयं. खरच.

जी-वन आपल्याला विधात्यान वन टाईम दिलेल आयुष्य म्हणून जीवन हे गाणं गात जगलं पाहिजे, क्यों कि “जींदगी ना मिलेगी दूबारा.” हो ना.

     गाण्यात जसे चढ उतार, आरोह-आवरोह, तान आवश्यकच आहेत तसेच आपल्याही जीवनात चढ-उतार, आरोह-आवरोह, तान आवशक आहेत. तरच जीवनाच गाणं सुरेल बनेल नाहीतर गाणं बेसूर वाटेल. “क्या बात है! जींकलस मित्रा! ची थाप पडली तर त्याहीपेक्षा सुंदर गायचा प्रयत्न करायचा. गाण्यावरची पकड सुटली, सूर लागला नाही की ती सुटलेली जागा आशी आळवायची की सूर लागलाच पाहिजे.”छे! छे! आपल्याला नाही जमणारं हे.” अस वाटलं की त्यात जम बसवायची जिद्द मनी बाळगायची, मग बघा कसं जीवनाच गाणं सुरेल बनतयं ते.

    जीवनात मांडलेल्या आंकांची बेरीज-गुणाकार न होता वजाबाकी-भागाकार व्हायला लागला की आपल्या आयुष्यात आपण साडेसाती लागली, राहु-केतुची महादशा सूरू झाली म्हणतो. पण हीच दशा आपल्या जीवनाला खरी दिशा देऊन जाते. माणसांना पारखण्याची कला शिकवते.आपलं परकं ,किती कुणाला जीव लावायचा आणि किती तोडायचा हे ही शिकवुन जाते. हळव्या घायाळ मनाला शायर बनवते तर कुणाला भडभडून मन मोकळं करायला लावून निर्भिड वक्ता बनवते इतकचं नाही तर अबोलांच्या लेखनीला धार देऊन डोळ्यात अंजन घालणारा लेखक बनवते. काहितरी ती देऊनच जाते. म्हणुनच “लाईफ में थोडा बॅड पॅच जरूरी होता है”.

  जीवन म्हणजे काय? अरे छोड दो ना यार! ते काय आहे त्याचा विचार करण्यापेक्षा ते जगायचं कसं? ह्याचा विचार जास्त महत्त्वाचा आहे. खळखळणाऱ्या पाण्यासारखं स्वच्छ निरागस जगायचं का साठलेल्या पाण्यासारख डबकं बणून आपल्याचं प्रश्नांच्या गुंत्यात गुंतत जायचं. का खोल जमिनीत एखाद्या खडकात झीरपून त्याच्या आवरणातं एकटं एकाकी जगायचं. कसही जगलं तरी ते जगलचं पाहिजे. तर मग गात जगलेलचं बरं नाही का?

 जीवनात येणाऱ्या प्रत्येक सुख-दुःख,आनंद-यातना, प्रेम-विरह, यश-अपयश, मान-सन्मान, साथ-धोका, जीवन-मृत्यु ह्या सप्तसूरांना गुंफत त्यांच सुरेल गाणं बनवूण गात जगावं.

 विं. दा .म्हणतात,

 “असे जगावे दुनिये मध्ये, आव्हानांचे लावुन अत्तर.        नजर रोखुनी नजरे मध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर.” 

 पारिजातकाला माहित असतं थोड्यावेळापुरतं त्याचं जीवन अहे तरीही तो रोज शुभ्र सात्वीकतेने फुलतोच आणि अंगणात फुलांची पखरणं करतोच आणि हा विरक्तं योगी इतरांना मोहिनी घालतो.

पतंग हे ही एका रात्रीच जीवन घेऊन येतात पण ते अंधारतून प्रकाशाच्या दिशेनेच झेपावतात. मुक्त-स्वच्छंदपणे बागडतात जणू, “आता कश्याला उद्याची बात” म्हणतं बागडतं बागडतं जीवनाचं गाणं गात गात कधी संपतात त्यांनाही कळतं नाही. पहाटे दिसतो तो त्यांच्या निपचीत पडलेल्या देहांचा खच. अगदी तसचं आपल्या पदरात पडलेल्या जीवनाच्या सुंदर घटीकांच गाणं झालचं पाहिजे कारण,

“आयुष्य छान आहे फार लहान आहे, रडतोस काय वेड्या जगण्यात शान आहे.”

                                -सौ. संजीवनी क्षिरसागर मांडे

Advertisements

2 thoughts on ““जीवन गाणे गातच रहावे”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s